शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना काढावा लागतो खड्डे व चिखलातून मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:35 IST

गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देगणेश नगरवासियांची व्यथा : नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.गणेशनगरच्या नागरिकांना जाण्याकरिता वर्धा-हिंगणघाट मार्गास जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजूला गोल्डन किड्स कॉन्व्हेंट तर दुसºया बाजूला महाकालीचे मंदिर आहे. या रस्त्याने विद्यार्थी, बालक, पालक आणि भाविकांची नेहमी गर्दी असते. वर्धा-हिंगणघाट या मार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहणाचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या भागात राहणाºया नागरिकांना त्यांच्या घरी जाण्याकरिता पाणी साचलेल्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याने अनेकदा किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत. त्यामुळे नागरिक मनात अपघाताची भिती घेऊन या मार्गे ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत खड्ड्यात झाडे लावली. नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत डागडूजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा समता सैनिक दल व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाला समता सैनिक दलाचे विदर्भ प्रदेश मार्गदर्शक अभय कुंभारे, भारीप बहुजन महासंघाचे शहर संघटक गौतम देशभ्रतार, विकास मून, मोहन मेश्राम, विजय वानखेडे, वसंता हातमोडे, शामराव डहाके, प्रदीप भगत, जयंत गोडघाटे, दादाराव सेलकर आदीसह नागरिक उपस्थित होते.पालिकेची हद्द समस्याग्रस्तगोल्डन किड्स कॉन्व्हेंट ते मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग हा नगर परिषदेच्या हद्दीत येत असून पावसाच्या दिवसात गणेश नगरातील या भागात रस्त्याची समस्या डोके वर काढत असते. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गणेश नगर भागातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा