शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी महाश्रमदान करून दुष्काळाशी केले दोन-दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:08 IST

किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा : किन्हाळा (ज.) येथील उपक्रमात महिला-पुरुषांसह चिमुकल्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ग्रामस्थांसह परिसरातील महिला-पुरुष व चिमुकले सहभागी झाले होते.या उपक्रमादरम्यान माजी आमदार दादाराव केचे यांनी किन्हाळा जसापूर येथे जावून हातात कुदळ व फावडे घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. गत वर्षी प्रमाणे याही वर्षी वॉटर कप आर्वी विधानसभा क्षेत्रातील गावाला मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही यावेळी श्रमदान केले.वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक गाव एकसंघ होत असल्याचे बघावयास मिळत असल्याचे म्हटले होते. ते येथे तंतोतंत खरे होत आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ७५ तालुक्यांनी सहभाग घेतला आहे. गत वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने पटकाविल्याने कप तालुक्यातच टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने श्रमदानाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी केले. वॉटर कप स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना गावांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाय रोख पुरस्कारही मिळणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.किन्हाळा येथील विशेष उपक्रमात माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह कारंजा पं.स.चे सभापती मंगेश खवशी, जि.प. सदस्य भाऊ खवशी, जि. प. अंकीता होले, किन्हाळाच्या सरपंच शालू दहीवडे, जसापूरचे सरपंच भोजराज बननगरे, अजय कट्टमवार, ग्रामसेवक कांबळे, हजारे, रावळे, हेमराज देवासे, नंदु पठाडे, अमोल आजनकर, सिता बैगने, सुरेखा कांबळे, कृषी सहायक इंगोले, सुरेखा हिराळे, रामचंद्र पठाडे यांच्यासह परिसरातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी तसेच विद्याथ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. श्रमदानाच्या माध्यमातून किन्हाळा (ज.) येथे जलसंवर्धनाची बरीच कामे करण्यात आली. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा