शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या दैनावस्थेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:37 IST

स्थानिक प्रभाग क्रं. ३ मधील मोठा नाला गत अनेक वर्षांपासून पाहिजे तसा स्वच्छ करण्यात आला नाही.

ठळक मुद्देप्रभाग ३ मधील प्रकार : पालिकेने तत्काळ कार्यवाही करण्याची रहिवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक प्रभाग क्रं. ३ मधील मोठा नाला गत अनेक वर्षांपासून पाहिजे तसा स्वच्छ करण्यात आला नाही. सध्या या नाल्यात ठिकठिकाणी कचरा साचून असून कुजलेल्या कचºयामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रहिवाशांची समस्या लक्षात घेता पालिका प्रशासनाने तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.प्रभाग क्रं. ३ मधील इंदिरावाडी, लेंडीपूरा, मातंगपूरा हा परिसर कष्टकºयांची वसाहत म्हणून ओळखल्या जातो. येथून मोठा नाला गेला असून तो पावसाळीपूर्वी नियोजनात वर्धा पालिकेच्यावतीने स्वच्छ करणे क्रमप्राप्त असते. परंतु, गत काही वर्षांपासून सदर नाल्यातील गाळ पाहिजे तसा काढण्यात न आल्याने सध्या ठिकठिकाणी नाल्यातील पाणी अडत आहे. इतकेच नव्हे तर नाल्यात कचरा कुजत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.सदर नाल्याची व्यवस्थित पणे स्वच्छता करण्यात यावी यासाठी तेथील रहिवाशांनी काही लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनाला माहिती दिली. परंतु, लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप या भागातील नागरिक करतात. पालिकेकडे नागरिकांनी विचारणा केली असता पावसाळ्याच्या सुरूवातीला नाला स्वच्छ करण्यासाठी कंत्राट देण्यात आला. कंत्राटदार नाला स्वच्छ करेल असे नागरिकांना सांगण्यात आले. मात्र, पावसाळा संपायला आला असला तरी कंत्राटदार नाला स्वच्छ करण्यासाठी येथे फिरकलाच नसल्याचे नागरिक सांगतात. नाल्याच्या अडणाºया सांडपाण्यात दिवसेंदिवस डासांची निर्मिती होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांना आमंत्रण मिळत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी प्रभाग क्रं. ३ मधील नाला स्वच्छ करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊले उचलण्याची मागणी आहे.कीटकजन्य आजाराला मिळतेय निमंत्रणप्रभाग तीन मधील नाल्याची स्वच्छता न करण्यात आल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. यात दिवसेंदिवस डासांची निर्मिती होत असून हा प्रकार डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी किटकजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. एखादी रोगराई येण्यापूर्वीच रोगराईला आमंत्रण देणारा नाला त्वरित स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी आहे. सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.