शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

पाणीटंचाईने नागरिक हैराण

By admin | Updated: March 17, 2017 01:58 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे.

उपाययोजना कागदावरच : पारोधीत भटकंती, वर्धेत पाईप पडले पण नळजोडण्या नाही वर्धा : जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. यात पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा खर्च दर्शविला आहे. असे असताना उग्र होत असलेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना होताना दिसत नाही. समुद्रपूर तालुक्यात पारोधी या गावात पाणी चांगलेच पेटले आहे. येथे पाण्याकरिता महिलांवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. तर वर्धा शहरातील पुलफैल भागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या भागात पालिकेच्यावतीने नळयोजनेचे पाईप टाकण्यात आले आहे. मात्र पालिकेत नळजोडणीकरिता कुठल्या नागरिकाकडून अर्ज आला नसल्याने येथे एकाही घरी नळजोडणी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. तर पालिकेच्यावतीने येथे एखादा सार्वजनिक नळ देणे गरजेचे असताना तोही देण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.(प्रतिनिधी) पाईपलाईन असताना नळ नाही; पालिकेकडून निदान सार्वजनिक नळ देण्याची गरज वर्धेतील पुलफैल परिसरातील नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. या भागातील नागरिकांना पाणी मिळावे याकरिता पालिका प्रशासनाच्यावतीने नळयोजनेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र या भागातील एकाही नागरिकाडून नळजोडणीकरिता अर्ज आला नाही. परिणामी नळ योजना कार्यान्वीत करून येथे कोणताही लाभ होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याकरिता या परिसरात असलेल्या हातपंपावरच अवलंबून राहावे लागत आहे. एकाच हातपंपावर सतत पाण्याचा उपसा होत असल्याने हा हातपंप आणखी किती दिवस साथ देईल, याचा कुठलाही नेम नाही. यामुळे येत्या दिवसात येथे पाणी टंचाई आणखी तिव्र होण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे पालिकेच्यावतीने या भागात वेळीच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची समस्या मार्गी काढण्याची मागणी आहे. पारोधीत पाणीटंचाई तीव्र; मार्ग काढण्याची मागणी समुद्रपूर- तालुक्यातील पारोधी गावातील पाणीटंचाईवर आंदोलनानंतर कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी, पाण्याकरिता महिलांच्या होणाऱ्या भटकंतीने असंतोष पसरला आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. येत्या चार दिवसात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग निघाला नाही तर येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुलेबाळे घेवून आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. गत १५ दिवसांपूर्वी पारोधी येथे पाणीटंचाई निवारणार्थ नवा बोर खोदण्याबाबत महिलांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि समुद्रपूर पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. त्यानंतर लोकशाही दिनी महिलांनी पुन्हा धडक दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात जात पाणीटंचाई निवारण्याच्या सूचना केल्या. यावरून तहसीलदार दीपक करंडे, बीडीओ विजय लोंढे यांनी गावात जात पाहणी केली. यावेळी त्यांनी गावात असलेली बोरची समस्या मार्गी काढण्याऐवजी विहीर अधिग्रहणाबाबत चर्चा करून ते परत आले. अद्याप येथील पाणी समस्या मार्गी निघाली नाही. यामुळे गावातील पाणी समस्या ताबडतोब सोडवावी याकरिता पारोधी येथील विद्या मेंढे, मीरा झाडे, प्रतिभा तांदुळकर, भारती लोणारे, छबुबाई आडकिने, रंजना कांबळे, शालू डंभारे, कमला अबलनकर, रमा ढाकणे, शीतल शेळकी इत्यादी महिलांनी पाणीटंचाई समस्या त्वरीत सोडवावी असी मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)