शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाच्या विरोधात नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:28 IST

तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्युत देयक न भरण्याचा निवेदनातून अधिकाºयांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील काही भागात १६ तासाचे भारनियमन केले जात आहे. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर जनजीवन विस्कळीत झाले असल्याचा आरोप करीत तात्काळ सुरू केलेले भारनियमन बंद करा अन्यथा आम्ही विद्युत देयके अदा करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून तालुका सरपंच संघटनेचे दिला आहे.वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने तालुक्यातील अनेक गावातील पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाली आहे. घागर-घागर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर भारनियमनामुळे ग्रामीण भागातील गव्हाचे पीठ करणाºया चक्की पासून ते शेतीच्या ओलिताची कामे ठप्प पडत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे दिवस असून विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांनाही याचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. शहरी भागात २४ तास विद्युत पुरवठा दिल्या जातो. तर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन होत आहे. हा प्रकार ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा असून तात्काळ भारनियमन बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील जनतेला सवताची वागणूक दिली जात आहे. येत्या काही दिवसांत निवेनाद्वारे करण्यात आलेल्या मागणीवर विचार न झाल्यास भारनियमन बंद होईस्तोवर महावितरणकडून दिल्या जाणारे विद्युत देयक तालुक्यातील नागरिक करणार नाही, असा इशाराही निवेदनातून महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आला आहे. सदर निवेदन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल कडु यांच्या नेतृत्त्वात महावितरणच्या अधिकाºयांना देण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यलय वर्धा यांना तर उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना धमेंद्र राऊत, बाळा सोनटक्के, दिनेश डेहनकर, अश्विन शेंडे, अरूण मांडवकर, रोशन राऊत, जीतेश मात्रे, अशोक कठाणे, योगेश सरोदे, रामु मसराम, प्रशांत भडके, पुरुषोत्तम ढोले, सागर ठाकरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व परिसरातील गावांमधील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.