शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय

By admin | Updated: February 24, 2017 02:08 IST

अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ३१ जागांवर विजय संपादन करुन काँग्रेसच्या बालेकिला ‘भगवा’ केला आहे.

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांची घसरण, तर सेनेला बढती आणि बसपाची एन्ट्री वर्धा : अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने तब्बल ३१ जागांवर विजय संपादन करुन काँग्रेसच्या बालेकिला ‘भगवा’ केला आहे. काँग्रेसची तीन जागांनी पिछेहाट झाली असून १३ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ दोन जागांवरच स्थिरावली. शिवसेनेने दोन जागा बळकावत आपले अस्तित्व कायम राखले, तर बसपाने दोन जागांसह जोरदार मुंसडी मारली. एका जागेवर रिपाइंने खाते उघडले. नगर पालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तामिल समजली जाते. या दोन्ही निवडणुकीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मतांचा कौल लक्षात येतो. या निवडणुकीत भाजपाने सर्वच राजकीय विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. ही निवडणूक भाजपचीसाठी खऱ्या अर्थाने अच्छे दिन घेऊन आली तर काँग्रेसला धोक्याची घंटा देणारी ठरली. अध्यक्षपदाचा मान हिंगणघाटला?भाजपाने जिल्हा परिषदेवर बहुमत प्राप्त केले असले तरी सर्वाधिक विक्रमी नऊ जागा हिंगणघाट विधानसभा मतदार संघात जिंकल्या आहेत. या विजयाचे श्रेय आ. समीर कुणावार यांना जाते. याच अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षपदावर हिंगणघाट तालुक्याचा दावा मजबूत असल्याची चर्चा भाजप गोटात सुरू झालेली आहे. जिल्हाध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावली(वाघ)गट याच प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून भाजपाचे उमेदवार नितीन रामचंद्र मडावी हे विजयी झाले असून भाजपश्रेष्ठी त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.