शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाही-सहानुभूतीमुळे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:36 IST

सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देझडशी जि.प.पोटनिवडणूक : मतमोजणीनंतर स्पष्ट होणार कौल

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.जिल्हा परीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या क्षेत्रातून विवेक हळदे हे काँग्रेसच्या चिन्हावर भरघोस मतांनी विजयी झाले होते. झडशी क्षेत्राच्या विकासासाठी धडपडणाऱ्या विवेक हळदे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. त्यामुळे येथील जागा रिक्त झाली. त्याच जागेसाठी २३ रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक अविरोध होईल, असा अंदाज मतदार व्यक्त करीत असताना सहा उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. यात काँग्रेसकडून सौरभ शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागत साबळे, भा.ज.पा.चे भुषण पारटकर, बसपाचे अरूण शंभरकर तर अपक्ष म्हणून विलास राऊत व रोषण राऊत राजकीय भविष्य आजमावत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत झडशी ग्रा.पं.मध्ये विवेक हळदे यांच्या पत्नीला मतदारांनी बहूमताचा कौल देत सरपंचपदी विराजमान केले.त्यामुळे या कुटूंबातून जि. प. निवडणुकीकरिता उमेदवार दिला नाही. तर टाकळी येथील ग्रा.पं.ची सत्ता हातात घेणाऱ्यांना जि.प.पोटनिवडणुकीचा मोह आवळता आला नसल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यात काँग्रेसचे शेखर शेंडे व पप्पु जयस्वाल असे दोन गट असले तरी. नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.पं.निवडणुकीत ते एकजूट असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यामुळे याही पोटनिवडणुकीत काँग्रेस चमकेल काय याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. तर भा.ज.पा.मध्ये उमेदवाराकरिता अनेक दावेदार असताना स्थानिक नेत्याने आपल्याच नातेवाईकास उमेदवारी दिल्याच्या कारणाने भाजपा कार्यकर्त्यात एकजुट नसल्याची चर्चा होत आहे. ही निवडणूक तिहेरी होईल, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात असून विवेक हळदे यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाटही या भागात असल्याचे बोलले जात आहे. परंतु, प्रत्यक्ष मतदान होऊन मतमोजणी झाल्यावरच विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे स्पष्ट होणार आहे.काँग्रेसचा गडमतदार कुणाच्या बाजूने बहुमताचा कौल देतात हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. झडशी जि.प. क्षेत्राकडे दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांचे विशेष लक्ष राहात असे. त्यामुळे हा काँग्रेसचा गड मानला जातो. या निवडणुकीत मतदार गड कायम ठेवणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक