शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामात चुरीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:26 IST

हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देडांबर की आॅईल, हा प्रश्नच : निकृष्ट कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतघोराड : हिंगणी ते शिवणगाव मार्गे चौकी, हिंगणा, जुनगड, केळझर जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याला नव्याने मुलामा देण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी केल्यास डांबरीकरण किती काळ तग धरेल, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.हिंगणी-शिवनगाव या पाच किमी अंतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तथा जुन्या डांबरीकरणाच्या रस्त्याला डांबराचा नव्याने मुलमा देत नवे रूप देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. नवा डांबराचा कोट टाकण्यापूर्वी रस्त्यावर टाकले जाणारे डांबर की आॅईल? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. या रस्त्यावर असणारी वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्याला अल्पावधीतच खड्डे पडण्याची शक्यता वाहनधारक व्यक्त करीत आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग होऊ नये व रस्ता अधिक काळ टिकावा यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.हमदापूर मार्गावर जीवघेणे खड्डेसेवाग्राम ते हमदापूर मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली अआहे. दोन मोठे खड्डे मात्र जीवावर बेतणारे ठरत आहेत. अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार काय, असा संतप्त प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.सेवाग्राम ते हमदापूर मार्गावर वाहतूक वाढली आहे. रात्री ऊशीरापर्यंत लहान-मोठी वाहने ये-जा करीत असतात. या रस्त्यावर पावलोपावली खड्डे आणि ऊखडलेली गिट्टी, उंचवटे तथा दबलेला रस्ता यामुळे वाहन चालविने कठीण झाले आहे. यात खोलगट खड्ड्यांची भर पडली आहे. श्रीकांत राऊत यांच्या शेताजवळ दोन खड्डे आहे. एक मध्यभाती असून दिसत नाही. अपघात होऊ नये म्हणून त्यात दगड टाकले आहेत. वळणावर लघू पाटबंधारे विभागाने रस्त्यामधून ढोला टाकून पाटसऱ्यांचे पाणी शेतात नेले. रस्त्याच्या बाजूने ढोला फुटून मोठे भगदाड पडले. रोड लहान व वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाल्याने बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही कराी, अशी मागणी वाहन चालक व नागरिक करीत आहेत.अल्पावधीत खड्ड्यांची शक्यताहिंगणी ते शिवणगाव रस्त्यावर प्रारंभी डांबराचा शिडकावा केला जात आहे; पण ते डांबर आहे की आॅईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय चुरीचाच अधिक वापर होत असल्याने या रस्त्याला अल्पावधीतच खड्डे पडण्याची शक्यता वाहनधारक तथा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.