शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडा

By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST

दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला

एज्यूकेशन व करिअर फेअरला प्रारंभ : संजय भागवत यांचे प्रतिपादनवर्धा : दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला कुठे जायचे आहे, हे आधी ठरवा आणि नंतर आपल्या अभ्यासक्रमाची निवड करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात तीन दिवसीय एज्यूकेशन व करिअर फेअरचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म़ गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र तर अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पीआरएसआयचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय, प्रदीप दाते आदी उपस्थित होते़ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच करिअर निवडीबाबत एज्यूकेशन व करिअर फेअरच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत यांनी केले़ रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून यासाठी क्षमतावृद्धीसारखे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत विशेष कार्यक्रम तयार केला आहे़ यात औद्योगिक समुहांना आवश्यक असणारे दीड हजार क्षमतावृद्धी संदर्भातील विषय निश्चित केले आहे. यामुळे भविष्याचा वेध घेऊन आपला अभ्यासक्रम ठरवावा, असेही भागवत यांनी सांगितले.कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध पर्याय उपलब्ध असून रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे. नवनवीन संधीची माहिती घेऊन त्यास अनुषंगिक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमाच्या माध्यमाचा लाभ घ्यावा. जनसंपर्क ईव्हेंट मॅनेजमेंट यासारखे नवीन दालने विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असून शिक्षण व रोजगार याचा समन्वय ठेवून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडियाचे वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय यांनी एज्यूकेशन व करिअर फेअरच्या आयोजनाबाबत माहिती दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक पीआरएसआयच्या वर्धा शाखेचे सचिव बी.एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष प्रा. प्रफूल्ल दाते यांनी मानले. शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील सेतू बांधण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत असून वर्धा जिल्ह्यात सर्वच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने हा जिल्हा एज्यूकेशन हब म्हणून ओळखला जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)