शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चोंडी शिवारात रंगली चक्क ‘काळविट’च्या मांसाची पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली. या चारही आरोपींना अटक करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगाव येथील न्यायालयात हजर केले असता या चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देवळी तालुक्यातील भिडीनजीकच्या चाेंडी शिवारात थेट काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी केली जात असल्याची माहिती मिळताच वर्धा वनविभागाने धडक कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून काळविटाची कातडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. असे असले तरी देवळी तालुक्यातील चोंडी शिवारात अवैधपणे काळविटाची शिकार करून काळविटाच्या मांसची मेजवानी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांना मिळाली. त्यानंतर वर्धा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, माधव माने, सारंग कोठेवार, अशपाक पठाण, प्रशांत कमिटी व कुकडे यांच्या चमूने शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली. या चारही आरोपींना अटक करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगाव येथील न्यायालयात हजर केले असता या चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.

मुख्य सूत्रधार ‘विनोद’चा घेतला जातोय शोध-   या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून अटकेतील आरोपींच्या कबुली जबाबावरून विनोद नामक एक व्यक्ती या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे विनोद नामक फरार आरोपीचा वनविभगााच्या अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. पण शनिवारी सायंकाळपर्यंत यश आले नव्हते.

मृत काळवीट मादीच-    वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटकेतील आरोपींकडून शिकार केलेल्या काळविटाची कातडी, नायलॉनचे तीन जाळे, काळविटाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेले सतूर, कुऱ्हाड व विविध साहित्य तसेच काळविटाच्या मांसाची शिजविलेली भाजी व स्टिलचा डबा आदी साहित्य जप्त केले आहे.तळणी शिवारातील शेतात झाली हिस्सेवाटणी-    शिकार केलेल्या काळविटाची आरोपींनी तळणी (खं.) येथील अनिल लक्ष्मण थूल यांच्या मालकीच्या शेतात हिस्सेवाटणी केली. त्यानंतर याच मांसाची मेजवानी करीत असताना चार आरोपींना वनविभागाच्या चमूने रंगेहात ताब्यात घेत अटक केली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून काळविटाच्या मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आराेपी वाढण्याची शक्यता असून फरार असलेल्या विनोद नामक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वे गुन्हा आहे, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.- रूपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग