शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीमध्ये ‘चायना मेड’ हद्दपार

By admin | Updated: October 27, 2016 00:43 IST

दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात.

नागरिकांमधील जागृतीचा परिपाक : सजावटीच्या आकर्षक वस्तूंनी सजली बाजारपेठ वर्धा : दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात. घरांची डेंटींग-पेंटींग, सजावट यासाठी वर्षातून एकदा दिवाळीला खरेदी केली जाते. विविध वस्तूंची खरेदी, रोषणाईसाठी दिवे आदी सर्व वस्तूंची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजारात चिनी वस्तूंवरच अधिक भर दिसतो; पण यंदा देशात घडत असलेल्या घडामोडी आणि शासनाचे आवाहन लक्षात घेत बाजारातून ‘चायना मेड’ हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे. दिवाळी सणासाठी सध्या बाजार सजला आहे. विविध आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध करून ग्राहकांची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी झालर, प्लास्टीक व अन्य वस्तूपासून तयार आकर्षक घंटी, तोरणे बाजारात अवतरली आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळते. दिवाळी सणासाठी पणत्यांनी बाजार सजला आहे. गत काही वर्षांपासून बाजारपेठेतील प्रत्येक वस्तूंमध्ये ‘चायना मेड’चा शिरकाव झाला होता. यावर्षी मात्र देशपातळीवरील घडामोडींमुळे चिनी वस्तूंचा प्रभाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आकाश कंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तूंमध्ये चिनी शिरकाव होता; पण यंदा नागपूर, मुंबई यासह देशातील अन्य भागात तयार वस्तूंची भरमार असल्याचे दिसून येते. दुकानदारांनीही यंदा शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चायना मेड वस्तू विकण्यापासून फारकत घेतल्याचे फेरफटका मारला असता दिसून आले. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही चायना मेड ला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोबाईल सोडले तर अन्य वस्तूंमध्ये ‘मेड इन इंडिया’ला प्राधान्य दिले जात असल्याचेच दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरीजमध्येही चायना मेडला हद्दपार करण्यात आले आहे. बहुतांश इलेक्ट्रीशीयन, कारागिर व दुकानदारांनी भारतात तयार झालेल्या सिरीज, विविध प्रकारचे दिवे वापरावर भर दिल्याचे दिसून येत आहे. काही इलेक्ट्रीशियनकडून इमारतींची रोषणाई करण्याचे कंत्राटं घेतले जातात. यासाठीही त्यांच्याकडून भारतीय सिरीज, दिव्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मोबाईल सोडून अन्य वस्तूंमध्ये चायना मेड हद्दपार झाल्याने आता नागरिकांनी भारतीय वा चिनी सोडून अन्य देशांच्या मोबाईलचा विचार करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांची भिस्त सोयाबीनवर, भाव पाडल्याचा आरोपदिवाळी हा महत्त्वाचा सण असला तरी महागाई वाढली आहे. यात शेतकऱ्यांचा टिकाव लागत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनची काढणी, मळणी केली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी सोयाबीनवरच भिस्त असल्याने लगबग सुरू आहे. दिवाळी सण साजरा व्हावा, ही अगतिकता शेतकऱ्यांची आहे. यामुळे मिळेल त्या भावात विकावे लागत आहे. व्यापाऱ्यांकडूनही याचाच फायदा घेतला जात असून हमीदरापेक्षा कमी भावात सोयाबीनची बोली लावली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.