शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

चिमुकल्यांचा किलबिलाटाने शाळा गजबजल्या

By admin | Updated: June 27, 2015 02:41 IST

दीड ते दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या.

वर्धा : नवीन दप्तर...नवी पुस्तके... नवा कंपास घेऊन जुन्याच मित्रांना शाळेत नव्या सत्रात भेटण्याचा दिवस शुक्रवारी उजळला. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपासून ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या. विद्यार्थ्यांमुळे मैदानेही पुन्हा खेळती झाली. शासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यात गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशी मिष्ठान्न देण्यात आले. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या.शाळेच्या परीक्षा आटोपताच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्यांचे वेध लागतात. सुट्यांचा आनंद झाल्यानंतर मुलांना पुन्हा शाळेची ओढ सुरू होते. वर्गमित्र केव्हा भेटणार अशी आस त्यांना लागते. शाळेचे मैदान त्यांना खुणावते. त्यांच्या या प्रतीक्षेचा गोड शेवट झाला आणि शाळेचा पहिला दिवस उजळला. शाळेत जाण्याची लगबग सकाळपासूनच सुरू झाली. माझा गणवेश कुठे आहे. माझे दप्तर कुठे आहे, असे म्हणत सकाळी घरी अनेकांचा कल्लोळ सुरू झाला. सकाळी ११ वाजता शाळेत शिरताच काही जुने तर काही नवे मित्र त्यांना मिळाले. आणि रंगल्या जुन्या गोष्टी. शाळेत जाताच वर्गखोली, त्यातील बेंच डेस्क याच्याशी जुळलेल्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गतवर्षी याच बेंच डेस्कवर बसून केलेल्या खोड्या, वर्गाला मारलेल्या दांड्या, कधी शिक्षकाची काढलेली छेड आठवताच हसणे टाळणे कठीण झाले. त्या गमती आपल्या वर्गमित्र मैत्रीणीसोबत वाटण्याचा आनंद शाळा सुटल्यानंतर बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत असल्याचे चित्र होते. (शहर प्रतिनिधी)शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय साहित्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासह सामाजिक न्यायदिन साजरा करण्यात आला. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ही मागे नाहीहल्ली व्हॉट्स अ‍ॅप वर प्रत्येकच दिवस साजरा होत असतो. त्यामुळे नूतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा या मथळ्याखाली शाळेचा पहिला दिवसही जल्लोषात साजरा झाला. जो तो आपल्या मुलांचे, भावाबहिणीचे शालेय गणवेशातील छायाचित्र अपलोड करीत होते. प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज ज्यांचा खरच शाळेचा पहिला दिवस होता त्यांच्या डोळ्यात आईपासून दुरावण्याचे अश्रू दिसत होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रडण्याचा आवाज शाळेच्या आवारात पसरत होता. असे असतानाही त्यांना पालकांना शाळेत सोडून काढता पाय घेतल्याचे चित्र होते; मात्र शाळा सुटण्याच्यावेळी आपल्या मुलाला भेटण्याकरिता आणि त्याला घरी नेण्याकरिता पालकही आतूर असल्याचे चित्र शाळांच्या आवारात दिसत होते.