शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरूद्ध चिमुकल्यांनी काढला निषेध मोर्चा

By admin | Updated: June 7, 2017 00:34 IST

जिल्ह्यात अतिप्रसंग व विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधीक्षकांना निवेदन : मुलींवर अतिप्रसंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात अतिप्रसंग व विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालून दोषींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी १० ते १२ वयोगटातील मुलींनी झलकारी सेनेच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढला. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना निवेदन देण्यात आले. मागील महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर व महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. शहरात बरबडी, गोरक्षण वॉर्ड व तारफैल आदी ठिकाणी नराधमांनी चिमुकलींवर बळजबरीने अत्याचार केला. गंभीर घटना घडूनही नागरिक पेटून उठत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. यामुळे आम्ही महिलांनी एकत्रित येऊन झलकारी सेना संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेमार्फत आम्ही गोरगरीब पीडितांना न्याय मिळवून देण्याकरिता लढा उभारणार आहोत. अत्याचारांच्या घटनांच्या विरोधात सोमवारी बजाज चोक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दहा ते बारा वयोगटातील शेकडो मुलींचा सहभाग होता. या चिमुकल्या मुलींनी पोलीस काका आम्हाला सुरक्षा द्या, पोलीस मामा आम्हाला सुरक्षा द्या, पोलीस काकू आम्हाला सुरक्षा द्या, आदी फलके हातात घेऊन घोषणा देत सुरक्षेची मागणी केली. हा मोर्चा बजाज चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचला. यावेळी पीडित मुलींना न्याय मिळवून देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्ष स्मिता नगराळे, सचिव जया मोटघरे, उपाध्यक्ष सुप्रिया कांबळे, कार्याध्यक्ष अर्चना ताकसांडे, सचिव माधुरी फुलमाळी, ज्योती जायदे, प्रज्ञा चांदणे, पूजा भगत, प्राची नगराळे, राणी मेश्राम, उज्वला रामटेके, शैला कांबळे, यांच्यासह शेकडो मुलींचा सहभाग होता. मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष शहरातील बजाज चौकातून निघालेल्या चिमुकल्यांच्या मोर्चाने नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले होते. बजाज चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाणारा हा मोर्चा व सहभागी चिमुकल्यांच्या हातातील फलक आकर्षण ठरले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर एसपी निर्मलादेवी यांनीही चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस करीत निवेदन स्वीकारले व सुरक्षेची ग्वाही दिली.