लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चाईल्ड लाईन व आगाज युवा बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गिट्टीखदान बोरगाव (मेघे) परिसरामध्ये बाल हक्क सरंक्षण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंगी (मेघे) ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक साखरे यांच्याहस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. परिसरातील सर्व बालकांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन घोष वाक्य व प्रेरणादायी गीतांच्या माध्यमातून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात आशिष मोडक केंद्र समन्वयक चाईल्ड लाईन वर्धा यांनी बालकांचे हक्क व अधिकारासंदर्भात माहिती देत चिमुकले हात मजुरी करीत नसून शिक्षणानाकरिता आहे. काळजी व सरंक्षणाची गरज असणाऱ्या प्रत्येक बालकांसाठी, बालमजूर, आरोग्यसेवा, शिक्षणाकरिता मदत बालकांना शोषणापासून मुक्त करण्याकरिता चाईल्ड लाईन १०९८ या आपातकालीन फोन सेवेला २४ तास फोनवरून माहिती देऊ शकता, असे आवाहन त्यांनी केले. भूषण मसने यांनी बालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत बालकांना मदतीकरिता सदैव तत्पर राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप वनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पुरूषोत्तम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता माधुरी शंभरकर, जयश्री निवल, शीतल घोडराव, कविता लोखंडे, गजानन मडावी, आशिष नंदनवार, विशाल नेहारे, अमोल चावरे यांनी प्रयत्न केले.
बाल हक्क संरक्षण रॅली
By admin | Updated: June 16, 2017 01:29 IST