शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बैल धुण्याकरिता गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 2, 2016 02:01 IST

तालुक्यातील वानरचुवा येथे पोळ्याच्या सकाळी बैल धुण्याकरिता तलावावर गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैंवी अंत झाला.

वानरचुवा येथील घटना : पोळ्याच्या सणावर गावात दु:खाचे सावटसमुद्रपूर : तालुक्यातील वानरचुवा येथे पोळ्याच्या सकाळी बैल धुण्याकरिता तलावावर गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैंवी अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. भूषण प्रकाश शाहारे असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या आई वडिलांना एकुलता एक असल्याने गावात पोळा सणावर शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, पोळ्याच्या दिवसी वानरचुवा येथील प्रकाश शाहरे यांचा मुलगा भूषण हा सकाळी गावातील काही नागरिकांसह तलावात आपला एक बैल धुण्याकरिता गेला होता. या वेळी सर्व शेतकरी आपले बैल धुन्यात व्यस्त असताना भूषण व त्याचा बैल खोल पाण्यात गेला. तलावातील या खोल पाण्यात बुडला. तलावानजीक भूषण दिसत नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो पाण्यात बुडून असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉ. गायकवाड यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, मोहगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास नवघरे, गिरड ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय तडस, बहादुरसिंग अकाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फकीरा खडसे, गिरडचे सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी एम. ओ. राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू टाकरखेड- कुलर पडून वायर तुटलेल्या वायरमुळे बसलेल्या विजेचा झटक्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना टाकारखेड येथे गुरुवारी सकाळी घडली. या महिलेला वाचविण्यास गेलेल्या घरातील दोन महिलाही जखमी झाल्या. त्यांच्यावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. लिलाबाई मारोतराव वाणे (६०) असे मृतक महिलेचे नाव आहे, तर वंदना लक्ष्मण वाणे (४५) व संगीता रविंद्र वाणे (४०) सर्व रा. टाकरखेड असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लिलाबाई काम करीत असताना विटावर ठेवलेला कुलर त्यांच्या पायावर पडला. याचवेळी वायर तुटल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. आवाज येताच वंदना आणि संगीता धावत गेल्या. त्यांनाही विजेचा झटका लागला. दोघी ओरडल्याने रविंद्र वाणे यांनी धावत जावून येत मुख्य बटन बंद केली. म्हणून दोघींचा जीव वाचला. अन्यथा या दोघीचांही मृत्यू झाला. लिलाबाई यांच्यामागे पती, दोन मुली, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.(वार्ताहर)