शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रसुलाबाद, विरुळ रस्त्याच्या मधोमध समृद्धी महामार्ग गेल्याने पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे पुलाखाली चिखल साचला असल्याने विरुळ ते रसुलाबाद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत. शेतात बैलबंडी नेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने पुलाखालील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांतून केली जात आहे.

नाल्याच्या पुरामुळे टेंभरी - परसोडीचा संपर्क अडचणीत- विरूळ (आकाजी) : मुसळधार पावसामुळे परसोडी - टेंभरी गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पुलाला पूर आल्याने काही काळ दोन्ही गावांचा संपर्क शुक्रवारी तुटल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील मजूर, नागरिक, विद्यार्थी यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. संबंधित प्रशासनाला येथील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. परंतु, ग्रामस्थांच्या या मागणीला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील सरपंच सुरेखा पंढरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग