शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:02 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,...

ठळक मुद्देप्रहार संघटनेची मागणी : शेतकºयांना एकरी २५ हजाराची मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळ जगताप यांनी गुरुवारला तहसीलदार विजय पवार यांना दिला. यावेळी त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनासह अळीयुक्त कापूस बोंडाची भेट पाठविण्यात आली आहे.अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात जे खचले त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर अनेकांनी या संकटासोबत लढा देण्याचा निर्धार केला. आता शेतकºयांपुढे बोंडअळीचे नवीन जैविक संकट उभे ठाकले आहे. शेकडो शेतकºयांचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त केले. एकरी २० ते २५ क्विंटल कापूस व्हायला पाहिजे होता तेथे दोन-चार क्विंटल उत्पादन होणे कठीण झाले. परिणामी कापूस लागवडी पासून वेचाईपर्यंतचा झालेल्या खर्चाची परतफेड कशी करावी आणि देणदारांचे देणे कसे फेडावे तसेच परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा बिकट प्रश्न निर्माण झाला.या संकटातून शेतकºयांना सोडविण्याकरिता शासनाने मंगळवार पूर्वी पाहणी करून बोंडअळी ग्रस्त शेतकºयांना रोखीने २५ हजार रुपयाची मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी प्रहार सोशल फोरमच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.प्रहार संघटनेने यापूर्वी सन २००९ मध्ये धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता विषप्राशन आंदोलन केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता याचीच पुनरावृती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.आर्वी तालुक्यात कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला. कर्जमाफीच्या आशेत शेतकºयांनी बँकेतून कर्ज न घेता उसणवारीवर कपाशीची लागवड केली. यात आता उत्पन्न येणार नसल्याचे चिन्ह असल्याने शेतकºयांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :cottonकापूस