शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
3
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
4
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
5
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
6
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
7
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
8
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
9
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
10
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
11
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
12
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
13
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
15
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
16
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
17
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
18
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
19
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
20
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

चिऊताईला आंघोळीला माती, ना घरट्याकरिता जागा

By admin | Updated: March 20, 2017 00:39 IST

शहर असो खेडे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात सिमेंटीकरण होत आहे. या सिमेंटीकरणात मातीचे आणि कौलारू घर काळाच्या पडद्याआड जात आहे.

जागतिक चिमणी दिन : सिमेंटच्या जंगलात हरवतेय बिचारी ; बचावासाठी पक्षीमित्रांकडून सामूहिक प्रयत्नांचे आवाहन रूपेश खैरी  वर्धा शहर असो खेडे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात सिमेंटीकरण होत आहे. या सिमेंटीकरणात मातीचे आणि कौलारू घर काळाच्या पडद्याआड जात आहे. यामुळे सर्वांच्या लाडक्या चिऊताईला घरटे बांधण्याकरिता जागा आणि आंघोळ घालण्याकरिता मातीच सापडत नाही. परिणामी, शहरात चिऊताईचा अधिवास धोक्यात आला आहे. यामुळे नजरेआड जात असलेल्या या चिऊताईच्या बचावाकरिता सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे. कधी अंगणात तर कधी घराच्या छतावर चीव-चीव करणारी चिऊताई आज नजरेआड जात आहे. ती डोळ्याने क्वचित दिसते. यामुळे येणाऱ्या पिढीला ती चित्रात किंवा बालगीतातच कानी पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त गत दोन दिवसांपासून पक्षी गणना सुरू केली आहे. तसेही वर्धेत प्रत्येक आठवड्याला येथील पक्षीअभ्यासक पक्षी गणना करतातच! गत दोन दिवसांसह रविवारी सकाळी येथील स्मशानभूमिच्या परिसरात पक्षी अभ्यासकांनी पक्षी गणना केली. यात त्यांना केवळ १२ चिमण्या दिसल्या. यामुळे सिमेंटच्या जंगलात वाढलेली उष्णता आणि तिला आवश्यक असलेली माती मिळत नसल्याने वर्धेतील हिरवळ असलेल्या स्माशानासारख्या जागीही ती नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे तिच्या बचावाकरिता सर्वांकडून सामूहिक प्रयत्न गरजेचे झाले आहे. चिमणी अदृश्य होण्याचे शहरी भागात केवळ मोबाईल टॉवरचे वाढते जाळे, हे एक कारण नाही तर वाढते सिमेंटीकरण, हे एक महत्त्वाचे कारण आहे. चिमणीला आंघोळ करण्याकरिता आवश्यक असलेली माती मिळत नसल्याने ती शहरापासून दूर जात असल्याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. - किशोर वानखेडे, अध्यक्ष, बहार नेचर फाउंडेशन, वर्धा जागतिक चिमणीदिनी घरट्यांचे वाटप सिमेंटच्या जगलात घरट्यांकरिता भटकत असलेल्या चिमणीला मातीचे घरटे व झाडांवर पक्ष्यांकरिता पाणी ठेवण्याकरिता मातीचे भांडे देण्याचा उपक्रम जागतिक चिमणी दिनी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी पक्षी संवर्धनाकरिता सहभागी होण्याचे आवाहन आहे. उन्हाळा येतोय.. चिऊताईसाठी पाणी अन् चारा ठेवा उन्हाळा तापणे सुरू झाला आहे. या दिवसांत पक्ष्यांची पाण्याकरिता भटकंती होते. यामुळे आपल्या घराच्या छतावर, पसरबागेत असलेल्या झाडावर लाडक्या चिऊताईकरिता पाणी ठेवण्याची गरज आहे. पाणी असलेले भांडे खूप खोल नसावे, घराच्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये, अंगणात पाणी ठेवता येईल. सोबतच तांदळाचे दाणे ठवेले तर एकदम बरेच! अंगावरील कीटक काढण्याकरिता चिऊताई करते मातीची आंघोळ आंघोळ करण्याकरिता साधारणत: पाण्याची गरज असते; पण चिऊताईला पाणी नाही तर मातीची गरज आहे. तिच्या अंगावर असलेले किटक काढण्याकरिता चिऊताई मातीची आंघोळ घालते. सर्वत्र झालेल्या सिमेंटीकरणामुळे आघोळ घालण्याकरिता तिला माती मिळत नसल्याने ती जंगलाच्या दिशने निघाली आहे. येथेही पाहिजे त्या प्रमाणात चिमणी दिसत नसल्याचे पक्षी मित्र सांगतात. गणनेत वर्धेत दिसल्या केवळ १२ चिमण्या हिरवळ व मातीसह पाणी असलेल्या वर्धेतील स्मानभूमित रविवारी सकाळी बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने पक्षी गणना केली. यात त्यांना केवळ १२ चिमण्या दिसून आल्या. या बारा चिमण्यांत पीत कंठी चिमणी असल्याचे सांगण्यात आले. इतर पक्ष्यांत परस मैना, साधी मैना, पांढऱ्या भोवईचा बुलबुल, साधा बुलबूल आदी पक्षी दिसले.