शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

‘एटीएम व्हेरीफिकेशन’च्या नावे फसवणूक

By admin | Updated: April 7, 2016 02:13 IST

अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनकॉल्सच्या माध्यमातून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’ कॉल सांगून फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यातच नाही तर राज्यात घडत आहेत.

बँक ग्राहकांना गंडा : पोलीस अधीक्षकांनी केले सावध राहण्याचे आवाहनवर्धा : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनकॉल्सच्या माध्यमातून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’ कॉल सांगून फसवणूक केल्याच्या घटना जिल्ह्यातच नाही तर राज्यात घडत आहेत. याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. ग्राहकांना लाखो रुपयांनी गंडविल्याचेही समोर आले आहे. या संदर्भात नागरिकांत जागरुकता यावी म्हणून थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.गत काही महिन्यांपासून ‘एटीएम व्हेरीफिकेशन’च्या नावावर बँक ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी क्रमांकावरून कॉल येतात. बँकच्या मुंबई वा दिल्ली आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगण्यात येते. एटीएम कार्डचे व्हेरीफिकेशन सुरू आहे. यासाठी कार्डवरील १६ अंकी क्रमांक तसेच पिन नंबर विचारला जातो. याला बळी पडून ग्राहक ती माहिती देतो. त्यानंतर काहीच वेळात खात्यातून पैसे कमी झाल्याचा संदेश फोनवर ग्राहकाला येऊन आपली फसगत झाल्याचे लक्षात येते. याबाबत दाखल झालेल्या तक्रारींवरून ही बाब उघड होत आहे. नियमानुसार बँक अशी कोणतीही माहिती मोबाईल फोनद्वारे विचारत नाही. यामुळे एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक आणि पिन नंबर कुणालाही सांगणे गरजेचे नाही. सदर दोन्ही क्रमांक केवळ बँक खातेदारालाच माहिती असणे गरजेचे आहे. एटीएम कार्डचा १६ अंकी क्रमांक व पिन नंबर न सांगितल्यास कार्ड बंद करण्याची धमकी दिली जाते; पण तसे काहीही होत नाही. यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता थेट संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधणे गरजेचे आहे. शिवाय पोलीस नियंत्रण कक्षामध्ये १०० क्रमांकावरही सूचना देता येते. एटीएममधून पैसे काढत असतानाही कुणाला आपला पिन नंबर दिसू देऊ नये, असे आवाहनही वारंवार केले जात आहे. एटीएमबाबत जनजागृतीसाठी पोलीस अधीक्षकांनी संबंधित पत्रक प्रकाशित केले आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून फसवणुकीच्या प्रकारावर आळा घालण्याचा प्रयत्न वर्धा पोलिसांकडून केला जात आहे. नागरिकांनीही एटीएम संबंधात कुणालाही माहिती न देता तत्सम कॉलबाबत पोलिसांना सूचना द्यावी असे आवाहनही ग्राहकांना केले जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)