शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएस १९९५ च्या पेन्शनधारकांची फसवणूक

By admin | Updated: August 3, 2016 00:59 IST

ईपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना अत्यल्प पेन्शन मिळत आहे. महागाईत या निवृत्त कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले.

प्रकाश येंडे : सभेमध्ये कामगारांना न्याय देण्याची मागणी पुलगाव : ईपीएस १९९५ च्या पेन्शन धारकांना अत्यल्प पेन्शन मिळत आहे. महागाईत या निवृत्त कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. सेवेत असताना वेतनातून कापण्यात आलेली रक्कम कामगारांना निवृत्तीनंतरही पूर्णपणे मिळत नाही. श्रमिकांच्या पेन्शन फंडाची बेकायदेशीर गुंतवणूक करून त्यांच्या पैशाची धुळधान करून शासनाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ च्या पेन्शन धारकांची फसवणूक केली, असा आरोप ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कामगार भवनात आयोजित सभेत ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, जीवनाच्या शेवटच्या उंबरठ्यावरील सेवानिवृत्त वेतन धारकांच्या पेन्शन फंडात केंद्र शासनाने आपला वाटा २००६ ते २०११ पर्यंतचे दोन हजार कोटी रुपये भरले नाही. यानंतर विलंबाने भरले. अद्याप ३,२०० कोटी रुपये न भरता कामगारांची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला. ईपीएस ९५ च्या पेन्शनधारकांना अत्यल्प पेन्शन मिळत असून अन्याय केला जातो. अन्याय दूर करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करा. पेन्शनधारकांना ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्या. कायद्यात दुरूस्ती होईपर्यंत अंतरिम राहत म्हणून कोशीयारी कमेटीच्या शिफारशी लागू करा या मागण्यांसाठी २१ आॅगस्ट रोजी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. सभेला रमेश सावरकर, धनराज पटले यांनी मार्गदर्शन केले. संचालन करीत आभार मांगीलाल व्यास यांनी मानले. याप्रसंगी गुणवंत ठाकरे, रामचंद्र पुरोहित, चंदन साहू, भीमराव डोंगरे, बाबा चरडे, सुरेश मानकर, प्रल्हाद भालेराव, चंद्रकांत झाडे, मुलचंद चंदन, साहू यासह कामगार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)