शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर लीजप्रकरणी कमी शुल्क आकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:47 IST

शासन आदेशात विनापरवानगी हस्तांतरण, जमीन वापरात बदल याबाबत प्रचंड शुल्क आकारण्यात आले आहे. शासनाने सुधारित निर्णय घेत शुल्कासंदर्भात मोठा बदल करीत लीजधारकांना दिलासा दिला आहे. महसूल व वनविभागाने २ मार्च २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करून नझुल जमिनीबाबत सुधारित शुल्क निर्धारण केले आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : पालिकेतील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील रामनगरातील जमीन भाडेपट्टयाचे नूतनीकरण व हस्तांतरण तसेच वापरातील बदल याबाबतची दर आकारणी महसूल व वनविभागाच्या २ मार्च २०१९ च्या सुधारित शासन आदेशाप्रमाणे कमी दराने करण्यात यावी, अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.रामनगर लीजप्रकरणी नगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, उपजिल्हाधिकारी सुके, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक जयंत सालोडकर तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वर्धा शहरातील रामनगर येथील लीजधारकांची लीज १९९१ पासून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या लीजचे नूतनीकरण करताना नगरपालिकेने महसूल व वनविभागाच्या २३ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेतला आहे. या शासन आदेशात विनापरवानगी हस्तांतरण, जमीन वापरात बदल याबाबत प्रचंड शुल्क आकारण्यात आले आहे. शासनाने सुधारित निर्णय घेत शुल्कासंदर्भात मोठा बदल करीत लीजधारकांना दिलासा दिला आहे. महसूल व वनविभागाने २ मार्च २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करून नझुल जमिनीबाबत सुधारित शुल्क निर्धारण केले आहे. त्यामुळे २ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार शुल्क आकारणी करण्यात यावी, अशा सूचना आमदार डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या आहेत.

 सुधारित शुल्क असेशासन निर्णयानुसार जमिनीच्या खरेदीबाबत नोंदणीकृत दस्तऐवज सादर केल्यास अथवा नियोजनातील अदलाबदलास प्राधिकरणाची मान्यता सादर केल्यास जमिनीच्या वार्षिक दर विवरणपत्रनुसार बाजार मूल्याच्या अडीच टक्के, वाणिज्यिकसाठी ५ टक्के रक्कम आकारण्याचे प्रावधान आहे तसेच विक्री हस्तांतरण किंवा वापरात बदलास परवानगी देण्यासाठी निवासी प्रयोजनाकरिता अडीच टक्के, वाणिज्यिकसाठी ५ टक्के, पूर्व परवानगी न घेता झालेली विक्री, हस्तांतरण किंवा वापरातील बदल करण्यासाठी जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार ५ टक्के, वाणिज्यिक वापरासाठी साडेसात टक्के तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर