शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओसह शासकीय कार्यालये प्रभारावर

By admin | Updated: June 23, 2014 00:14 IST

उपविभागीय अधिकाऱ्यासह आर्वीच्या शासकीय कार्यालयाचा कारभार अतिरिक्त भारावर सुरू आहे. या कारणाने येथे येणाऱ्या नागरिकांची शासकीय कामाकरिता त्रेधा उडत आहे.

कामांचा खोळंबा : अधिकारी अप-डाऊनच्या वारीवरसुरेंद्र डाफ - आर्वीउपविभागीय अधिकाऱ्यासह आर्वीच्या शासकीय कार्यालयाचा कारभार अतिरिक्त भारावर सुरू आहे. या कारणाने येथे येणाऱ्या नागरिकांची शासकीय कामाकरिता त्रेधा उडत आहे. यामुळे उपविभागात रिक्त असलेली पदे भरण्याची गरज निर्माण झाली आहे.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीन तालुके मिळून आर्वी शहरात उपविभागीय कार्यालय तयार झाले; परंतु या गावातील उपविभागीय महसूल अधिकारी या महत्त्वाच्या पदासह आर्वीतील विविध शासकीय कार्यालयाचा भार अतिरिक्त प्रभारावर सुरू आहे. अधिकारी पदाचा प्रभार असलेले अनेक अधिकारी ये-जा मध्ये अडकल्याने शासकीय कामाची गती मंदावली आहे. सामान्य नागरिकांना साध्या कामासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून ‘साहेब आज नाहीत’ हे ऐकूण आल्यापावली परत जाण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारावीचा व दहावीचा निकाल लागून आठवडा उलटत आहे. पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात जातीचा दाखला, उत्पन्न, क्रिमीलेअर, रहिवासी प्रमाणपत्र व इतर दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आर्वीचे उपविभागीय अधिकारी शेखर सिंग यांची बदली झाल्याने त्यांचाही अतिरिक्त कार्यभार तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे आहे. सध्या त्यांच्यावर तिहेरी भार आहे. यात पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थितीची समस्या आहेच. शिवाय आर्वी उपविभागात मोठ्या प्रमाणात गौणखनिज संपत्ती आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल यंत्रणेला डोळ्यात तेल घालून रहावे लागत आहे. असे असताना येथे अधिकऱ्यांची पदे रिक्त आहेत. जून - जुलै या दोन महिन्यात महसूल, तहसील व शासकीय कार्यालयाच्या कामाचा, नैसर्गिक, आपत्ती व इतर महत्त्वाची कामे असतात. आर्वीत मात्र अतिरिक्त भाराचा ताण असल्याने कामे खोळंबली आहेत. याचा सामान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.