शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाने आजारांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:15 IST

अत्यल्प पाऊस, तापलेले उन्ह आणि निर्माण झालेले दमट वातावरण यामुळे विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देशासकीय रुग्णालये फुल्ल : खासगी दवाखान्यांतही गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अत्यल्प पाऊस, तापलेले उन्ह आणि निर्माण झालेले दमट वातावरण यामुळे विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसते. व्हायरल फीवरसह अन्य आजारांच्या रुग्णांतही वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालये फुल्ल असून खासगी दवाखान्यांमध्येही गर्दी वाढली आहे. प्रत्येक घरात एक रुग्ण दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.यंदा समाधानकारक पाऊस येईल हे भाकित खोटे ठरले असून जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, रोगट वातावरणाची निर्मिती झाली आहे. कधी ढग तर कधी तप्त उन्ह यामुळे सर्दी, खोकला, ताप तथा डासांमुळे मलेरियासदृश्य आदी आजारांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयांसह खासगी दवाखाने सध्या याच रुग्णांनी भरलेले दिसतात. वातावरणाचा सर्वाधिक परिणाम चिमुकल्यांवरच दिसत असून त्यांची जोपासणा कररण्याचा सल्ला वैद्यकीय व्यावसायिक देतात.सेलू ग्रामीण रुग्णालयात वाढली गर्दीसेलू/घोराड : वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सेलूच्या ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या मागील आठवड्यात वाढली आहे. दररोज येथील बाह्यरुग्ण विभागात ३०० पेक्षा अधिक रुग्ण आरोग्य तपासणीकरिता येत आहे. एखाद्या दिवशी यापेक्षाही अधिक रुग्ण दिसून येतात. या रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी आहे. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीकरिता लागणारा वेळ पाहता रुग्ण आपल्याला बोलविण्याच्या प्रतीक्षेत रांगेत ताटकळत असतात. येथील बाह्यरुग्ण विभाग हा दुपारी उशिरापर्यंत सुरू ठेवला जात आहे. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना समाधानकारक वैद्यकीय सेवा मिळत असल्याने या परिसरातील रुग्ण प्रथम ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य देतात; पण रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता बाह्यरुग्ण विभागात सकाळ पाळीत दोन वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केल्यास रुग्णांना रांगेत ऊभे राहण्याची वेळ येणार नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.सर्दी ,ताप, खोकला,हे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. व्हायरल फीव्हर असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सकाळ पाळीत रुग्ण अधिक असतात.- डॉ. अभिजीत हरणे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, सेलू.