शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

वर्षभरातच त्याच्या जीवनात घडले परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:50 IST

सेवाग्राम येथे वास्तव्यास असलेला व पूर्णत: व्यसनाधिन इसम जिल्हा पोलीस अधीक्षक व कन्यारत्न कल्याणकारी प्रोत्साहन समितीच्या पुढाकाराने अवघ्या वर्षभरात सुधारला. ही काल्पनिकता नव्हे तर वास्तवात घडलेला प्रकार आहे.

ठळक मुद्देसामाजिक संघटनाचा पुढाकार : तरूण झाला व्यसनमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम येथे वास्तव्यास असलेला व पूर्णत: व्यसनाधिन इसम जिल्हा पोलीस अधीक्षक व कन्यारत्न कल्याणकारी प्रोत्साहन समितीच्या पुढाकाराने अवघ्या वर्षभरात सुधारला. ही काल्पनिकता नव्हे तर वास्तवात घडलेला प्रकार आहे.सेवाग्राम येथे बळजबरीने पैसे हिसकावणे, अवैध दारू विकणे, मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करणे, दहशत माजविणे असे काम करणाऱ्या इसमाचे परिवर्तन करण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व कन्यारत्न समितीचे संस्थापक डॉ. आनंद ढोबळे यांच्या पुढाकाराने झाले. त्याच्या तीन सहकाºयांनीही सुधारणेबाबत शपथ घेतली आहे. यापुढे सेवाग्राम गावात कुठेही अवैध व्यवसाय, गुंडगिरी, छेडछाड करणार नाही व होऊ देणार नाही, ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सहा महिन्यांपूर्वी स्टॅम्प पेपरवर असे शपथपत्र त्यांनी तयार करून दिले. त्याच्यातील या परिवर्तनाचे स्वागत करताना सदर इसमाचा रविवारी हनुमान मंदिराच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तीन एकर जमीन देण्याचे डॉ. ढोबळे यांनी जाहीर केले. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या निवासस्थानी सोमवारी त्याचा सत्कार केला गेला. अध्यक्षस्थानी उमरेडच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रा.डॉ. प्रज्ञा गिरडकर तर अतिथी म्हणून प्रा. रजनी सातपुते, अ‍ॅड. ऋतुजा पळसपगार, डॉ. विजया बालपांडे, नारायण झोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच रोशना जामलेकर यांनी केले तर आभार स्मिता जोशी यांनी मानले.व्यसनाधीनांना सभेत पाठवाव्यसनी खर्रा, गुटखा, मद्यपी, तंबाखू आदी खाणाऱ्या युवक, पुरूष, महिला यांना अपमानीत न करता सभेसाठी पाठवा, अशी विनंती डॉ. ढोबळे यांनी या बैठकीत केली. यावेळी देह व नेत्रदानाच्या अर्जाचे नि:शुल्क वितरण करण्यात आले.