शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपतींनी लावले चंदनाचे रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:52 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात महादेवभाई देसाई कुटीसमोरील जागेवर चंदनाचे झाड लावले.

ठळक मुद्देसूतकताई केलीआश्रमाची माहिती जाणून घेतली

दिलीप चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/ वर्धा: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता, मुलगी स्वाती यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. आश्रमात त्यांना फक्त नमस्कार करून स्वागत करण्यात आले. प्रथमच पारंपारिक पध्दतीला सुरक्षेचे कारण ठेवून स्वागताला फाटा देण्यात आला.आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.ऊन.प्रभू यांनी आदी निवास, बा कुटी,बापू कुटी महादेव कुटी इ ची माहिती दिली. आदी निवासाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपती व त्यांच्या पत्नी यांनी आदी निवास मध्ये ठेवलेल्या अंबर चरख्यावर सूत कताई केली.बापू कुटी मध्ये सर्व धर्म प्रार्थना झाली. महादेवभाई देसाई कुटीतील कपास से कपडा या उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली.राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता आणि मुलगी यांनी महादेव कुटीतील अंबर चरख्यावर सूत कताई करून पाहिली .रोजच्या सूत कताईला येणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद पण साधला. .महादेवभाई देसाई कुटीसमोरील जागेवर राष्ट्रपती यांनी चंदनाचे झाड लावले. त्यावेळी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांचा परिचय टी.आर.एन.प्रभू यांनी करून दिला.आश्रम प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रपती यांनी लिहिला.यात सेवाग्राम आश्रमात येण्याचा विषय माझ्यासाठी सम्मान जनक आहे. गांधीजींची १५० वी जयंती आपण साजरी करीत आहोत. हे पवित्रस्थळ शांती,प्रेम, करूणा, दयाभाव व न्याय याचे जीवनातील सार्वभौम सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे. आश्रमची पवित्र भूमी राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. ज्यामुळे स्वातंत्र्यासाठी बळ मिळाले ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. बापूंनी जनसामान्यासाठी प्राथमिक शिक्षा, आरोग्य व स्वच्छता सह सामाजिक , आर्थिक ग्रामोत्थानाचे कार्याला प्रारंभ केला. या आश्रमात कुष्ठरोग निवारण कार्यक्रम सुरू केला .या रोगाच्या उन्मूलनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कामासाठी आज पण आम्हाला बापूंपासून प्रेरणा मिळत आहे. आपल्या देशवासियांसाठी समस्त मानव जातीकरिता शांती, प्रगती आणि समृध्दीच्या मार्गावर जाण्यासाठी आम्हाला सेवाग्राम आश्रम आणि बापूंचे जीवन गाथेमुळे सदैव मार्गदर्शन प्राप्त होत राहणार आहे. राष्ट्रपती यांनी आश्रमच्या अध्यक्षांना "महात्मा गांधी ए लाईफ थ्रू लेंसेस" हे पुस्तक इंग्रजी व हिंदी भाषेतील दिले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद