शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून साखरीसह चना व तूर डाळ बेपत्ता

By admin | Updated: March 13, 2017 00:45 IST

होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरण पोळी असते. हीच पुरण पोळी सर्वसामान्यांकरिता यंदाच्या होळीत महागडी ठरणार आहे.

अनागोंदी कारभार : होळीची पुरणपोळी महागच \वर्धा : होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरण पोळी असते. हीच पुरण पोळी सर्वसामान्यांकरिता यंदाच्या होळीत महागडी ठरणार आहे. ऐन होळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानातून तूरीसह चना डाळ आणि साखरही बेपत्ता झाली आहे. शासनाच्या या अनागोंदी धोरणामुळे पुरणाकरिता पाहिजे असलेली चना डाळ व साखर गरजवंतांना बाजारातून महागड्या दराने विकत घ्यावी लागणार आहे. कुणी उपाशी राहू नये याकरिता शासनाच्यावतीने स्वस्त दरात प्रत्येकाला धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातच वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने विशेष पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांकरिता स्वस्त धान्य दुकानातून शासकीय दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना शासनाच्या या योजनेत धान्य पुरविण्याकरिता शासन कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांकरिता धान्य मंजूर झाले तरी ते वितरण प्रणालीत असलेल्या दोषामुळे अद्याप दुकानात पोहोचले नसल्याचे वर्धेतील वास्तव आहे. सर्वत्र धान्याची मागणी असताना यातही केवळ गहू आणि तांदूळ मंजूर झाले. तूर व चना डाळीकरिता आणि साखरेकरिता लाभार्थ्यांची भटकंतीच होत आहे. शेतमालाचे पडलेले भाव आणि घसरलेली आर्थिक पत यामुळे सणाच्या दिवसात या योजनेतून किमान साखर मिळावी, अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची अपेक्षा होती; पण शासनाच्या अनागोंदी धोरणामुळे त्यांना सणाच्या दिवसात साखरेपासूनही वंचित राहावे लागत आहे. शासनाने शेतकरी लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेला गहू व तांदूळ दुकानात पोहोचला नाही. यामुळे त्यांना सणाच्या तोंडावर वर्धेतील स्वस्त धान्य दुकानातून रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी) शासनाकडून केवळ गहू आणि तांदूळच मंजूर स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, डाळ आणि साखर आदींचा पुरवठा करण्याच्या सूचना आहेत; पण शासन स्तरावर या सूचनांना बगल दिली जात असल्याचे दिसते. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सर्वच धान्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असता त्यांच्याकडून केवळ गहू आणि तांदळाचा पुरवठा करण्यात आला. इतर धान्य केव्हा येईल याची शाश्वतीही दिसत नसल्याची माहिती पुरवठा विभागातील सुत्रांनी दिली.