शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ भूदान यज्ञ बोर्डाच्या गठनाला देणार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:44 IST

येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसेवा संघाची राष्ट्रीयस्तरावरील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आचार्य विनोबा भावे यांची १२५ व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय संमेलन घेण्याचा निर्णय तसेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांची १५० वी जयंती २ आक्टोबर २०२० पर्यंत साजरी करण्यात येणार असल्याचे सर्व सेवा संघाच्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. पत्रकात मध्यप्रदेश भूदान यज्ञ अधिनियम १९५३ च्या कलम ३३ (अ) नुसार सर्व सेवा संघाद्वारे बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्यांना नामित करण्याचे प्रावधान आहे; पण सरकारने अशा संस्थाद्वारा नामित व्यक्तींची समिती बनविली जी वास्तवात नाही. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत सर्व सेवा संघाद्वारा नामित व्यक्तीना भूदान मंडळावर घेण्यात आलेले आहे. ही पहिलीच वेळ ज्यातून उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याचा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. बैठकी बाबत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी सांगितले की, ११ सप्टेंबर २०१९ मध्ये भूदान आंदोलनाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची १२५ जयंती सुरू होणार आहे. या बाबत राष्ट्रीय स्तरावर संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. देशात वेगवेळ्या भागात पदयात्रा काढण्यात येणार असून विनोबा भावे यांच्या जीवन आणि कार्यावर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बैठकीत माजी आय. पी. एस. अधिकारी संजीव भट्ट यांना चुकीच्या पद्धतीने फसविल्याने हा चिंतेचा विषय असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग गठीत करण्याची मागणी करण्याचे ठरले. शिवाय म. गांधी व कस्तुरबा यांची १५० वी जयंती २ आक्टोंबर २०२० पर्यंत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.