शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या पूर्वसंध्येला एकावर चाकूहल्ला

By admin | Updated: March 13, 2017 00:38 IST

होळीच्या पूर्वसंध्येला इतवारा भागातील दोन युवकांनी तेथीलच रहिवाशी असलेल्या विहार बंडू पाटील याच्यावर चाकू हल्ला

दोघांना अटक : इतवारा परिसरातील घटना वर्धा : होळीच्या पूर्वसंध्येला इतवारा भागातील दोन युवकांनी तेथीलच रहिवाशी असलेल्या विहार बंडू पाटील याच्यावर चाकू हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी इतवारा भागातील मच्छी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशीरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी विक्की बाबुराव सोळंकी व शुभम खत्री दोन्ही रा. इतवारा बाजार परिसर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की सोळंकी व शुभम खत्री हे दोघे विहार याच्या मामेभावाला शिवीगाळ करीत होते. या दोघांना शिवीगाळ का करता अशी विचारणा करण्यासाठी विहार गेला होता. दरम्यान संतापलेल्या विक्की व शुभम या दोघांनी जवळ असलेल्या चाकूने विहारवर हल्ला चढविला. आरोपींनी चाकूने विहारच्या मानेवर, पोटावर व पाठीवर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने विहारला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची विहार पाटील याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी विक्की सोळंकी व शुभम खत्री या दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. रविवारी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावरून रक्तमिश्रीत माती व साध्या मातीचे नमुने घेण्यात आले आहे. गोळा केलेले नमूने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(शहर प्रतिनिधी)