शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

प्रसादासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:14 IST

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाप्रसाद वितरणातून विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. विना नोंदणी अन्न पदार्थांचे वितरण कायद्याने गुन्हा असल्याने गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्तींना अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या नियमान्वये नोंदणी करणे अन्न व औषध प्रशासन विभागाने आता अनिवार्य केले आहे.जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. यापूर्वी अन्य जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.याकरिता गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्ती यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता कोणत्याही आधार केंद्रातून किंवा सर्व सेवा केंद्रातून (सीएससी) किंवा ६६६.  www. foodlicensing. fassao.gov.in  या संकेतस्थळावर अन्नसुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये नोंदणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.गणेश मंडळांसाठी या आहेत सूचनाप्रसाद तयार करताना स्वयंपाक तयार करण्याची जागा स्वच्छ, नीटनेटकी व आरोग्यदायी असावी. प्रसाद तयार करताना कुठलेही कीटक त्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसादाकरिता लागणारा कच्चा माल , अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावे, त्याबाबतचे पक्के देयक घ्यावे. भांडी स्वच्छ, नीटनेटकी व झाकण असलेली असावी. शिल्लक राहिलेल्या प्रसादाचा पुनर्वापर दुसऱ्यादिवशी करू नये. कढी किंवा आमटीसारखे अन्नपदार्थ कल्हई न केलेल्या पितळी भांड्यात तयार करू नये, फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या परवाना, नोंदणीधारकाकडून करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी, प्रसाद तयार करणाºया स्वयंसेवकास अ‍ॅप्रॉन ग्लोव्हज, टोपी आदी पुरवावे, प्रसाद उत्पादन, वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठलाही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी, प्रसादाकरिता खोवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थांचा वापर होत असल्यास ताजा असल्याची खात्री करावी. जुना, शिळा अनेक दिवस शीतपेटीत ठेवलेला मावा प्रसादासाठी वापरू नये. प्रसाद तयार करणाºया मंडळांनी कच्च्या मालाचे देयक कॅटरर्स, स्वयंपाकी, स्वयंसेवक, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक माहिती लिहून ठेवावी. तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून सहकार्य करीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019