शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी घेतला ग्रामसेवकांचा आढावा

By admin | Updated: July 27, 2016 00:04 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता

स्वच्छ भारत मिशन : आॅक्टोबर अखेरपर्यंत देवळीत हागणदारीमुक्तीच्या सूचना देवळी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता देवळी पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची मंगळवारी आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी देवळी तालुका आॅक्टोबर अखेरपर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. गावाच्या विकासाकरिता सर्वप्रथम गाव हागणदारीमुक्त करणे गरजेचे असून या कामास प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. आढावा सभेला पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शालीक मेश्राम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपसभापती गुलाब डफरे, जि.प. सदस्य उज्ज्वला राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित खाडे, संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशन बाबत ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. तसेच देवळी तालुका आॅक्टोबर २०१६ अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करावयाचा असून त्यादृष्टीने ग्रामसेवकांनी नियोजन करावे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये शौचालय बांधकाम झाले आहेत; मात्र रिपोर्टींग केल्या जात नसल्याने जिल्ह्याची प्रगती समाधानकारक दिसत नाही. तेव्हा लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम होताच त्वरित स्वच्छ भारत मिशन कक्षास कळवावे. लाभार्थ्यांस वेळेवर प्रोत्साहनपर बक्षीसाची रक्कम देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शिवाय ग्रामसेवकांच्या समस्याही जाणून घेतल्या. देवळी तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये ७,४५६ शौचालयाचे उद्दिष्ट असून जुलैपर्यंत १,४१४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ३२७ शौचालयाचे बांधकाम सुरू असून ६३ ग्रामपंचायती पैकी १६ ग्रा.पं. सर्व्हेनुसार हागणदारीमुक्त झाल्याची माहिती गटविकास अधिकारी शिंदे यांनी दिली.(प्रतिनिधी)