शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीधारकांना दिलेले आश्वासन केंद्र शासनाने पाळावे

By admin | Updated: November 9, 2016 01:00 IST

देशातील १८६ उद्योग क्षेत्रातील असंघटीत कामगारांसाठी १९९५ मध्ये केंद्र शासनाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना

पुंडलिक पांडे : अन्यथा तीव्र आंदोलनपुलगाव : देशातील १८६ उद्योग क्षेत्रातील असंघटीत कामगारांसाठी १९९५ मध्ये केंद्र शासनाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ ईपीएस-९५ लागू केली. यातील निवृत्तीवेतन तोकडे असून कर्मचारी साधे जीवनही जगू शकत नाही. यात सुधारणा करण्याची ग्वाही विरोधी पक्षात असताना भाजपाने दिली होती. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन भाजपाने पाळावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी रविवारी दिल्ली येथे संघटनेची राष्ट्रीयस्तर सभा आहे. यात आंदोलनात्मक भूमिका ठरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सचिव पुंडलिक पांडे यांनी दिली.ईपीएस-९५ मध्ये व्यवस्थापनाचा ८.३३ टक्के वाटा राहत असून केंद्र शासनाचा १.१६ टक्के वाटा असतो. केंद्र शासनाने ही योजना लागू केली; पण दरदिवशी होणारी जीवनावश्यक वस्तुची दरवाढ, निवृत्तीनंतर कुटुंबाचा वाढता खर्च लक्षात घेतला नाही. उलट योजना कार्यान्वित झाल्यापासून त्यात मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात संबंधितांचा साधा खर्चही होऊ शकत नाही. त्यांना जीवन जगणेही कठीण होत आहे. शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी खासदार भगतसिंह कोशियारी समिती स्थापन केली; पण अद्याप उपयोग झाला नाही. ईपीएस-९५ ही केंद्र शासनाची योजना १९९५ पासून देशातील सर्व निमसरकारी, खासगी क्षेत्रातील कामगारासाठी लागू आहे. या योजनेंतर्गत देशातील खासगी क्षेत्रातील ५४ लाखांपेक्षा अधिक निवृत्तांना बोटावर मोजण्याइतके वेतन मिळत आहे. या योजनेच्या लाभधारकांकडे लाखो सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. यामुळे या योजनाधारकांच्या अत्यल्प वेतनामुळे लाखो कुटूंब प्रभावित झाले असून उघड्यावर जीवन जगत आहे. कामगारांच्या वेतनातून नियमितपणे कपात करून कोट्यवधी रुपये मागील कित्येक वर्षांपासून जमा करण्यात आले; पण केंद्र शासनाने गत काही वर्षांत आपल्या वाट्याची कोट्यवधीची रक्कम जमा केली नसल्याचा आरोप पांडे यांनी केला. महागाईत निवृत्तांना अधिकाधिक एक हजार रुपये निवृत्ती वेतन मिळत आहे.भाजपा सत्तेत आल्यास हा प्रश्न तात्काळ सोडवू, अशी ग्वाही दिली होती; पण भाजपला आश्वासनाचा विसर पडला. लाभार्थ्यांचे हाल पाहून खा. रामदास तडस व इतरांनी लोकसभेत हा प्रश्न मांडला; पण त्याकडेही शासन दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाने कोश्यिानी समितीच्या शिफारशी लागू करीत निवृत्तांना ३ हजार रुपये निवृत्तीवेतन, महागाई भत्ता लागू करून आश्वासन पाळावे, अशी मागणी ईपीएस राष्ट्रीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे, महासचिव पुंडलिक पांडे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)