शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समितीकडून रस्त्यांची चौकशी सुरू

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी

तीन दिवस मुक्काम : पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचार खणून काढणार?वर्धा : मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी तीन सदस्यीय समितीच वर्धेत पाठविली आहे. ही समिती स्थानिक अधिकाऱ्यांनाच सोबत घेऊन चौकशी करीत असल्यामुळे योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस यईल, याबाबत पहिल्याच दिवशी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीने हिंगणघाट तालुक्यातील रस्त्यांची चौकशी केली.समिती वर्धेत येत असल्याची बाब खा. रामदास तडस यांना केंद्राकडून कळली. स्थानिक विभागाने मात्र त्यांच्यापासून ही माहिती दडवून ठेवली. हिवाळी अधिवेशनात खा. तडस यांनी शून्य प्रहरात विदर्भात आणि वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मागील पाच वर्षांच्या कालावधीत रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याची केंद्र शासनाकडून गंभीर दखल घेण्यात येईल, तसेच अधिवेशन संपताच तीन सदस्यीय समितीमार्फत सर्व रस्त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यामुळे अधिवेशन संपण्याकडे तक्रार कर्त्यांचे लक्ष होते. अधिवेशन संपताच दिलेल्या आश्वासनानुसार ही समिती वर्धेत दाखल झाली. यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील स्थानिक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वी बंद करून ठेवले आहे. सदर समिती नेमकी कोणत्या रस्त्यांची चौकशी करीत आहे. याबाबत खासदार तडस यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. सूत्रनुसार ही समिती पहिल्याच दिवशी हिंगणघाट तालुक्यात पोहचली. बोरगाव ते पारडी या मार्गाची तपासणी करण्यात आली. नंतर समुद्रपुरातील काही मार्गांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. ही समिती अधिकाऱ्यांच्या संगणमताने रस्त्यांची चौकशी करीत असल्यामुळे केवळ औपचारिकता पूर्ण करते वा भ्रष्टाचार खणून काढते, याकडे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने चौकशी जुन्या केंद्र सरकारच्या काळात वर्धा जिल्ह्यातील पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरुन केंद्रीय पथक चौकशीसाठी आले होते; मात्र या समितीने नाममात्र चौकशी केली होती. त्यामुळे वास्तविकता पुढे आली नाही.सदर प्रकरण पुन्हा नव्या सरकारात पुढे आले. यानुसार शासनाने पुन्हा एक समिती नेमून वर्धेत पाठविली आहे. या समितीत तीन सदस्य आहे. समितीबाबत स्थानिक विभागाने तक्रार करणारे खा. रामदास तडस यांनाच अंधारात ठेवले आहे. त्यामुळे हा विभाग समितीला चांगले रस्ते दाखवून मोकळा होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.