शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी सौंदर्यीकरणापासून दूरच

By admin | Updated: March 29, 2015 02:12 IST

शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

सेलू : शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. सोयी सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी नदीच्या व नाल्याच्या काठावर आहेत. काही ठिकाणी शेतात अंत्यविधी कार्यक्रम पार पाडले जातात. शासनाने गत १० वर्षांत स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अंत्यविधी पार पाडण्याकरिता शेडची व्यवस्था केली. पण यातील बहुतेक शेडचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने त्यांनी दुरावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. सौंदर्यीकरणासाठी शासनाचा निधी मिळत नसल्याने मृतावर अंतिम संस्कार करतेवेळी उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांना सावली व बसण्याची व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.नदी व नाल्याच्या काठावर गावा शेजारी असलेल्या स्मशानभूमीला गोदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अपयश येत असून कुठेही तारेचे कुंपण आढळून येत नाही. आजूबाजूला झाडे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात साावलीचा आसरा मिळणेही कठीण जाते, तर पावसाळ्याच्या दिवसात प्रेत जाळताना अदचणी येतात. ग्रामीण भागातील स्मशानभूमी सोयी-सुविधायुक्त व्हावी, सौंदर्यीकरण केल्या जावे, किमान पाण्याची तरी सोय करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक नेहमीच संताप व्यक्त करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)