शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट मार्गाची दैनावस्था

By admin | Updated: June 12, 2017 01:48 IST

गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे.

रस्ता नूतनीकरणाची गरज : पावसाळ्यात येते तळ्याचे स्वरूपलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे. त्याची दुरूस्ती करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाला तळ्याचे स्वरूप येते. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाहीची मागणी आहे.प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या गावात रामनवमी यात्रेला तर संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघणारा पालखी सोहळा ज्या मार्गाने जाते तो ग्रा.पं.कार्यालय ते जगनाडे मंदिर चौक व विठ्ठल रूखमाई मंदिर या रस्त्याचे २० वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रस्त्याचे नुतणीकरण केले नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजू रस्त्यापेक्षा उंच केल्याने पावसाचे पाणी नालीत वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. थोडा जरी पाऊस आला तरी या खड्ड्यात पाणी साचते. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्याचे नव्याने सिमेंटीकरण करण्यासाठी शासकीय निधी मिळाल्याचा गवगवा झाला होता. याकडे खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून या रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास प्रतीपंढरीतील हा पालखी मार्ग खड्डेमय व जलमय राहणार नाही, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. ग्रा.पं. भवन बांधकामासाठी कर्ज रूपात निधी मिळाला तर असंख्य भाविकांचे पदकमल ज्या रस्त्याला लागतात. त्या रस्त्याच्या नुतनीकरणासही निधी घ्यावा, अशी मागणी आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर चिखल तयार होतो. बऱ्याच दिवस रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. वेळोवेळी पाऊस झाल्यास रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, रस्त्यावरील खड्ड्यांचाही अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती राहत असल्याने योग्य कार्यवाहीची गरज आहे.अपघाताची भीतीग्रामपंचायत कार्यालय ते विठ्ठल रुखमाई मंदिर दरम्यानच्या सिमेंट रस्त्यावर पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा सहन अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्याचप्रमाणे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. वाहन अनियंत्रित होण्याची भीती नेहमीच असते. नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची मागणी आहे.