शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यावरील ‘तो’ झरा झाला बंद, दुरूस्तीचे काम सुरू

By admin | Updated: July 9, 2015 02:12 IST

गत दोन महिन्यांपासून सिमेंट रस्त्याच्या मधोमध पाण्याचा झरा वाहत होता.

वृत्ताची दखल : पाण्याचा अपव्यय थांबणारसेलू : गत दोन महिन्यांपासून सिमेंट रस्त्याच्या मधोमध पाण्याचा झरा वाहत होता. याबाबत लोकमतने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची नगरपंचायतीने दखल घेत सदर नळ जोडणी बंद करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरील पाण्याचा झरा बंद झाला आहे.सेलू येथील मेडिकल चौकातून घोराडकडे जाणाऱ्या मार्गावर घरगुती नळ जोडणीच्या लोखंडी नळीला छिद्र पडले होते. यातून सकाळ-सायंकाळ तास-दीड तास मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. शिवाय रस्त्याच्या मधातच पाण्याचे कारंजे उडत होते. याकडे लोकमतने लक्ष वेधताच नगर पंचायतमध्ये कार्यरत कर्मचारी प्रशांत रहागडाले यांनी त्वरित दखल घेत ती नळ जोडणी बंद करण्यासाठी कामाला लावल्याचे मजूराने सांगितले.या नळाची चौकशी केली असता ती घरगुती वापराची नळ जोडणी असली तरी बरेच दिवसांपासून वापरात नसल्याचे सांगण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावर त्या नळ जोडणीची लोखंडी नळी वाहनाच्या वर्दळीमुळे फुटली असल्याचे सांगण्यात येते. रस्त्याच्या मधोमध उडणारे कारंजे बुधवारी बंद झाल्याने रस्त्यावरून आवागमन करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शहरात अन्यत्र कुठे अशा नळ जोडण्या आहे काय, याचा शोध घेतला जाणार असल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. नगर पंचायत प्रशासनाने वृत्ताची दखल घेत दुरूस्ती केल्याने तुर्तास पाण्याचा अपव्यय थांबला आहे.(शहर प्रतिनिधी)