शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
3
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
4
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
5
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
6
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
7
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
8
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
9
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
10
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
11
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
12
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
13
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
14
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
15
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
16
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
17
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
18
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
19
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
20
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन

शहरातील सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:06 IST

शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे.

ठळक मुद्दे८७ लाखांचा झाला खर्च : गुन्हेगारांचा शोध घेण्यातही येतेय अपयश

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे. परिणामी, तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.बुधवार १६ जानेवारीला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील दोन ठिकाणी स्कूटरस्वार लुटारुदांपत्याने किरकोळ साहित्य घेण्यासाठी दोन हजाराची नोट देऊन मिळालेले पैसे व आपली दोन हजाराची नोट घेऊन पळ काढण्याच्या घटना घडल्या. संत तुकडोजी वाडॉतील कलोडे सभागृहासमोरील माया मनोहर ब्राह्मणवाडे यांचे किरायाच्या दुकानात या दाम्पत्याने दोन हजाराची नोट देत १०० रुपयांच्या भांड्यांची खरेदी केली. शिवाय १,९०० रुपये परत घेतले. त्यानंतर हो नाही करत दोन हजाराची नोट व १ हजार ९०० रुपये तसेच भांडी घेवून दुचाकीने यशस्वी पळ काढला. तर अर्ध्या तासाने याच दांम्पत्याने कारंजा चौकातील टिनाचे दुकानात वृद्ध महिलेला दोन हजाराची नोट देऊन ३३५ रुपयांची रंगीत फायबर शीट खरेदी करून १ हजार ७६५ रुपये परत घेतले. परंतु, साहित्य परत करण्याचा कांगावा करून दोन हजारांची नोट परत मिळविली. तसेच तेथून पळ काढला. या दोन्ही दुकादारांनी लहान रक्कम म्हणून पोलिसात तक्रार केली नाही; पण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात प्रशांत भाईमारे व सहकाऱ्यांनी गंडा घालणाºयांचा शोध सुरू केला आहे. परंतु, त्यानाही अनेक अडचणी येत आहेत.केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमतासदर घटनेनंतर ठगबाजांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रिकरण मिळवत ते तपासले. परंतु, केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमता असल्याने पोलिसांच्या हातीही काहीच लागले नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोण केंद्रस्थानी ठेवून जास्त स्टोअरेज क्षमतेची तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी आहे.आमदारांच्या प्रयत्नाअंती मिळाला निधीशहरातील छोट्या-छोट्या हालचालींकडे लक्ष ठेवत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावा या हेतूने आ. समीर कुणावर यांच्या प्रयत्नाअंती ५४ सीसीटीव्ही बसविण्यासाठी ८७ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. उशीरा का होईना मुंबईच्या एका एजंसीला कंत्राट देऊन आॅगस्ट २०१८ मध्ये कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तीन महिन्यात कामपूर्ण करण्याचा करार असताना सहा महिने होऊन सुद्धा काम पूर्ण झाले नाही. शहरात १५ ठिकाणी कॅमेरे लागले आहेत. पण एका ठिकाणचे काम शिल्लक आहे, हे विशेष.फलक ठरतोय अडथळाशहरातील कारंजा चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आला आहे. परंतु, नगरपालिकेच्यावतीने लावण्यात आलेल्या स्वच्छच्या जनजागृतीच्या फलकामुळे सीसीटीव्हीच्या कॅमेरे झाकोळले गेले आहेत. यामुळेच कॅमेऱ्यांच्या चित्रिकरणात अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी न.प.द्वारे कुठलाही फलक लावण्यास मनाई करण्यात आल्याचा सूचना फलकदेखील लावण्यात आला आहे. फलक लावून पालिकेनेच नियमाची पायमल्ली केल्याची बाब स्पष्ट होत आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही