शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सावधान, विद्युत देयक न भरल्यास ऐन दिवाळीत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात महावितरणने तब्बल ३ लाख ९८ हजार ७७४ ठिकाणी विद्युत जोडणी दिली असून या ग्राहकांकडे तब्बल ३२१.६१ कोटींची रक्कम थकली आहे. थकबाकीदारांनी वेळीच देयक अदा करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अजूनही अनेकांनी विद्युत देयक न भरल्याने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर महावितरणने थकबाकी वसुलीला गती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात महावितरणने तब्बल ३ लाख ९८ हजार ७७४ ठिकाणी विद्युत जोडणी दिली असून या ग्राहकांकडे तब्बल ३२१.६१ कोटींची रक्कम थकली आहे. थकबाकीदारांनी वेळीच देयक अदा करावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, अजूनही अनेकांनी विद्युत देयक न भरल्याने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर थकबाकीची रक्कम न भरणाऱ्यांवर अंधारात राहण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आहे. 

महावितरणचे ग्राहक काय म्हणतात

कृषिपंपांना पूर्णक्षमतेने केवळ आठ तास विद्युत पुरवठा दिला जातो. मागील दोन वर्षांपासून नापिकी पदरी येत असल्याने कृषिपंपाचे विद्युत देयक थकले. पण पीक निघाल्यावर थोडे-थोडे करून विद्युत देयक अदा करूच. महावितरणच्या अधिकाऱ्यांची अडचण शेतकरी समजतो, पण शेतकऱ्यांचीही अडचण महावितरणने थोडी समजून घेतली पाहिजे.- सुरेंद्र उईके, शेतकरी 

कोविड संकटकाळात अनेकांचे रोजगार हिरावले. त्यामुळे पोट कसे भरावे हाच पहिला प्रश्न अनेकांच्या डोळ्यासमोर होता. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कसाबसा रोजगार मिळायला लागला आहे. थोडे-थोडे करून विद्युत देयक अदा केले जात आहेत. महावितरणनेही थोडे दमाने घेतले पाहिजे.- महादेव चौधरी, नागरिक.

विद्युत देयकापोटी नागरिकांकडे मोठी थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्य तसेच कृषीपंपधारकही आहेत. मोठ्या  थकबाकीमुळे आमच्याही अडचणीत भर पडली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम दिवाळीपूर्वी भरून महावितरणला सहकार्य करावे. आणि आपली दिवाळी प्रकाशमान करावी.- अशोक सावंत, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज