शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहने अपघातास कारण

By admin | Updated: August 9, 2014 01:44 IST

जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गापैकी एक वर्धा-नागपूर महामार्ग आहे. गत अनेक दिवसांपासून वर्धा पवनार मार्गादरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

वर्धा : जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गापैकी एक वर्धा-नागपूर महामार्ग आहे. गत अनेक दिवसांपासून वर्धा पवनार मार्गादरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतूक विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे. यवतमाळ-वर्धा-नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ चालते. नागपूरवरून आलेली वाहने वर्धा शहरात न जाता दत्तपूर बायपास वरून ती सरळ यवतमाळकडे वळती होतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत नाही. परंतु नागपूरकडून यवतमाळकडे जाणारी वाहने दत्तपूरच्या अलिकडे पवनार-वर्धा दरम्यान जागोजागी मुक्कामाला असतात. वाहन चालक बिनधास्तपणे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रभर ही वाहने या मार्गावर असतात. सकाळीही ती तशीच उभी असतात. या मार्गावर प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या वाहनामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. हा प्रकार या मार्गावर आता नित्याचाच झाला आहे. नियमबाह्यपणे अशी वाहने रात्र-रात्र वाहतुकीच्या मार्गावर उभी ठेवणे धोक्याचे आहे. असेअसतानाही वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा वाहनांवर दंड ठोठाविण्याची मागणी जोर धरत आहे. रात्रभर वाहने रस्त्यावर उभी करताना काही आवश्यक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रात्री ये-जा करीत असलेल्या वाहनांना ही वाहने दिसत नाही. त्यामुळे ती उभी केल्यावर इंडिकेटर सुरू ठेवणे, गाडी रस्त्यावर येईल अशी उभी न करणे अशा अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक असतानाही या नियमांचा पायमल्ली केली जात असल्याने ही वाहने अपघातास कारण ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)या मार्गावर वाहने उभी करताना नियमांची पायमल्ली करीत असतात. एकाला पाहून दुसरा, तिसरा असे करीत वाहनांच्या रांगा या मार्गावर उभ्या असतात. रात्री या वाहनांखाली स्वयंपाक केला जातो. वाहने गेल्यावर ते उरलेले अन्न खान्यासाठी कुत्र्यांची गर्दी पहावयास मिळते. हा मार्ग मुळातच वर्दळीचा आहे. मुख्य मार्गांपैकी एक असा हा मार्ग असल्याने प्रवासी वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होते. या मार्गावर अशी वाहने उभी करणे धोक्याचे असून दुचाकी चालकांना यामुळे प्रवास करणे धोक्याचे होऊन जाते. दुचाकी चालकांना वाहने उभी ठेवून असलेल्या परिसरातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गाने लोखंडी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अनेक दा मर्यादेपेक्षा जास्त जड वाहतूकही या मार्गाने वारंवार होत असल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडत असतात.