शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे घेऊन जाणारा ट्रक पलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:39 IST

जनावरे घेऊन जाणाºया ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी वाहन जप्त केले. शिवाय ३२ गुरे ताब्यात घेण्यात आली.

ठळक मुद्देसिनेस्टाईल पाठलाग : ३४ पैकी १० गुरे गंभीर तर २२ किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जनावरे घेऊन जाणाºया ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी वाहन जप्त केले. शिवाय ३२ गुरे ताब्यात घेण्यात आली. यातील दोन गुरांचा मृत्यू झाला. ही कारवाई बुधवारी पहाटे वायगाव चौरस्त्यावर करण्यात आली. यातील तीन आरोपींनी पळ काढला तर ट्रक जप्त करण्यात आला.ट्रक क्र. एमएच ३६ एफ ३३५८ ने गोंदिया, भंडारा येथील जनावरे कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून वडनेर, हिंगणघाट, अल्लीपूर व देवळी पोलिसांनी नाकाबंदी केली; पण ट्रक चालकाने सर्व नाकेबंदी तोडून पळ काढला. यामुळे तीनही ठाण्याच्या पोलिसांनी पाठलाग केला. हा सिनेस्टाईल प्रकार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. यानंतर देवळी पोलिसांनीही धोत्रा चौरस्त्यापासून ट्रकचा पाठलाग केला. वायगाव (नि) चौरस्ता येथे नाकाबंदी असल्याने ट्रकने वेगातच वळण घेतले. यामुळे ट्रक पलटी झाला. यावेळी संधी साधत तीन आरोपींनी पळ काढला.उलटलेल्या ट्रकमध्ये ३४ गाई व बैल होते. यातील दोन गुरांचा मृत्यू झाला तर ३२ गुरे पोलिसांनी ताब्यात घेतली. यातील १० गुरांना गंभीर तर २२ गुरांना किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून आले. पोलिसांद्वारे सर्व गाई व बैल अड़ेगाव येथील गो-शाळेत पाठविण्यात आली. या प्रकरणाचा पूढील तपास देवळी पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे करीत आहेत.