वर्धा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ राज्य कार्यालय परिसरात रविवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, महासंघाचे राज्य सरचिटणीस गजानन थुल, जिल्हा अध्यक्ष संजय लोखंडे, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव प्रदीप लोखंडे, विदर्भ अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष अशोक म्हैसकर, कार्याध्यक्ष शशीकांत अडसड, नागपूर विभागाचे सचिव सिताराम राठोड, आरोग्य विभागाचे सचिव रामचरण बुंदिले, महसूल विभागाच्या अध्यक्ष मिरा मेश्रामकर, सचिव मधुकर ठाकरे, कार्याध्यक्ष सत्यजीत भोतभांगे, धर्मपाल कांबळे, आरोग्य सेविका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष सुशीला शिंदे, वैशाली छापेकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे वृक्षारोपण
By admin | Updated: October 24, 2016 00:37 IST