लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव व परिसरात बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहायक तथा तलाठ्यांनी शेतांचे पंचनामे केले. याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.गुलाबी बोंडअळीने कपाशीवर हल्ला चढविला. यामुळे परिसरातील शेतकरी गारद झाले. संतप्त शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडली, ट्रॅक्टर फिरविले. यानंतर शासनाने कृषी विभागाला बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामे करा व त्वरित अहवाल सादर करा, असे आदेश दिले. यात केवळ कागदच तर काळे होणार नाही ना, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. परिसरातील शेतांचे सालोड मंडळाच्या कृषी सहायक साधना ढुमणे, चिकणी येथील तलाठी मंगेश ठमके तथा निमगावचे तलाठी तडस हे पंचनामे करीत असून अहवाल सादर करणार आहेत.
शेतकऱ्यांना अहवालाचेच गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:24 IST
चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव व परिसरात बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी कृषी सहायक तथा तलाठ्यांनी शेतांचे पंचनामे केले. याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना अहवालाचेच गाजर
ठळक मुद्देबोंडअळी सर्वेक्षण : शेतांचे पंचनामे