शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा

By admin | Updated: June 11, 2017 00:54 IST

मान्सूनला सुरुवात होताच वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत अपघात होतात.

दुर्घटना टाळा : महावितरणचे ग्राहकांना आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मान्सूनला सुरुवात होताच वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत अपघात होतात. असे संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत घराबाहेर असताना तसेच घरातही विजेबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. वीज वाहक तार तुटून पडल्याचे नजरेस आल्यास तात्काळ जवळच्या महावितरणच्या कार्यालयास कळवावे. त्यासाठी १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे महावितरणने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. तुटलेल्या तारांना हात लाऊ नये. त्या ओलांडू नयेत व इतरांनाही तसे करु देऊ नये. तसेच जनावरे, गुरेढोरे अशा तुटलेल्या तारेजवळ जावू देऊ नयेत. विद्युत वाहिनीजवळील झाडाच्या फांद्या तोडावयाच्या असल्यास महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना देऊन लाईन बंद करून घेण्यात यावी. वीज वाहिनीच्या खांबास जनावरे, गुरेढोरे बांधू नयेत. वीज वाहिनीखाली वा वाहिनीजवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये. तसेच झाडे लावू नयेत. कपडे वाळत घालण्याची तार वा वायर वीजवाहिनीच्या खांब अथवा स्टेला बांधू नये. वीजवाहिनीच्या खालून जाताना तसेच गॅलरीत किंवा गच्चीवर धातूची वस्तू हाताळताना तारेपासून वस्तू दूर व सुरक्षित अंतरावर राहील, याची काळजी घ्यावी. कोणत्याही कारणास्तव लाईनवर चढू नये. वीज वितरण यंत्रणेवर अथवा वीज सर्किटवर जादाचा भार टाकू नये. वीजवाहिनीच्या तारांवर हूक टाकून वीज वापरण्याचा प्रयत्न करू नये. वीजपुरवठयाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनधिकृत काम करण्याचा प्रयत्न करू नये. खासगी वायरमनकडून फक्त घरातील वायरींचे काम करून घ्यावे. वीज वितरण यंत्रणेवरील कोणतेही काम खाजगी व्यक्तींमार्फत करून घेऊ नये. वीजवाहिनीच्या खांबाच्या तसेच स्टेच्या आर्थिंग वायर्स व स्टे वायर तोडू नयेत किंवा हाताळू नयेत. आपल्या विद्युत मांडणीचे अर्थिंग कार्यक्षम ठेवावे. तसेच मान्यताप्राप्त ठेकेदारांकडूनच कामे करून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. घरात वीज वापरतानाही खबरदारी आवश्यक घरातील विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा. मीटरच्या जागेत पाणी झिरपते का याची खातरजमा करावी. तसे आढळल्यास मीटरचा मुख्य स्विच तात्काळ बंद करावा. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तात्काळ मीटरची जागा बदलावी. पावसाळ्यात उबदार जागा म्हणून कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या मीटरच्या खालील जागेचा आश्रय घेतात. यामुळेही शॉर्टसर्किट घडू शकते. उच्च दाब वीजपुरवठा आवश्यक असलेल्या मिक्सर, हीटर, गिझर, एअरकंडिशनर, फ्रीज यासाठी थ्री-पिन सॉकेटचा वापर करावा. विद्युत उपकरणे दुरुस्त करताना मेन स्विच बंद करावा. पावसाळ्यात पायात रबरी चपला घालाव्यात. पायाखालची जमीन ओली नसल्याची खात्री करून घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्यात जोडू नये.