शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघातात पत्नी ठार, पती गंभीर

By admin | Updated: January 5, 2017 00:34 IST

शाळेतून परत येत असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला वर्धा-आर्वी मार्गावरील सेवा पाटीजवळ भरधाव कारने समोरासमोर जबर धडक दिली.

कार चालक पसार : जखमी व मृतक शिक्षक आकोली : शाळेतून परत येत असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या दुचाकीला वर्धा-आर्वी मार्गावरील सेवा पाटीजवळ भरधाव कारने समोरासमोर जबर धडक दिली. यात दुचाकीवरील पत्नीचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. किरण गायाकवाड (शेळके) असे मृतक महिलेचे नाव असून राजेंद्र गायकवाड रा. वर्धा असे जखमीचे नाव आहे. हे दोघही एकाच शाळेत शिक्षक असून ते वर्धेकडे जात असताना त्यांना एका भरधाव कार चालकाने धडक दिली. कार चालक वाहन सोडून पसार झाला. राजेंद्र गायकवाड हे एमएच ३२ डब्ल्यु ६७०३ क्रमांकाच्या दुचाकीने पत्नी किरण सोबत खरांगणावरून वर्धेकडे जात होते. दरम्यान, सेवा पाटीजवळ वर्धेवरून येणाऱ्या एमएच ३२ सी ६४५ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात सदर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आंजी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद राऊत, दिनेश गायकवाड, सचिन पवार व अमर हजारे यांनी तातडीने रुग्णवाहीका बोलावून घटनास्थळी धाव घेतली. दोनही जखमींना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले; मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. राजेंद्रवर उपचार सुरू आहे. यावेळी कार चालकाने घटनास्थळी पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून कार चालकाचा शोध सुरू आहे.(वार्ताहर)