पवनार : वर्धा-पवनार मार्गावर मामा भांजा समाधीजवळ कार व मालवाहू आॅटोत अपघात झाला. यात पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.या अपघातात विनोद राऊत, नारायण मुजबैले, विठ्ठल राऊत सर्व रा. घोराड हे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात आणखी दोघे असे एकूण पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांची ओळख पटली नाही. ही कार येथील सेवाग्राम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची असल्याची चर्चा आहे.पोलीस सुत्रानुसार, एम ३१ डीव्ही ४५८९ क्रमांकाची कार वर्धेकडून पवनारकडे जात होती. तर एमएच ३२ बी ६९८९ क्रमांकाचा अॅपे पवनारकडून वर्धेकडे येत होता. ह दोन्ही वाहने समोरासमोर येताच हा अपघात झाला. कारमध्ये तीन तर अॅपेमध्ये चार व्यक्ती होत्या. या अपघातात अॅपेचालक विनोद तुकाराम राऊत (३६) याच्यासह नारायण मुजबैले, विठ्ठल राऊत या तिघांसह अन्य दोघे असे पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू आहे.(वार्ताहर)
कारची अॅपेला धडक, पाच जखमी
By admin | Updated: January 15, 2016 02:52 IST