शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवरुन व्हायरल झाला उमेदवारांचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 20:07 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात खळबळ पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाहीचा उत्सव सुरु होताच राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. अद्यापही पक्षांकडून उमेदवारांची अधिकृतरित्या घोषणा झाली नसल्याने अनेक इच्छुकांच्या बेडूक उड्या सुरुच आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडीया सेलने पोलीस अधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.सोमवारी सकाळपासूनच आरएसएस असे नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या लेटर हेडवरुन २० सप्टेंबर २०१९ ही तारीख नमुद असलेला आंतरिक सर्व्हे ४७-वर्धा विधानसभा मतदार संघ या शिर्षकाखाली चार इच्छुक उमेदवारांच्या नावाने जातीनिहाय व्हायरल करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हा सर्व्हे व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांमुळे भाजपातीलही काही पदाधिकाऱ्यांसह स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे शहानिशा केली. तेव्हा त्यांना असा कोणताही सर्व्हे संघाने केला नाही, असे कळले. त्यामुळे हा प्रकार अनधिकृत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा आणि राजकीय वातावरण गढूळ करण्याचा असल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा वर्धेचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, धनंजय भट, निलेश मुंजे, सारंग परिमल, मेघजित वझे यांच्यासह भारतीय जतना पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास मोहता, प्रणव जोशी, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, कपिल शुक्ला, वर्धा विधानसभाप्रमुख जयंत कावळे, माधवराव वानखेडे, जगदीश टावरी, राकेश मंशानी, गिरीश कांबळे, राहूल करंडे, सुमित गांजरे आदींनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.या क्रमांकावरुन व्हायरल झाला सर्व्हेसोमवारी सकाळपासूनच वर्धा विधानसभा मतदार संघातून भाजपाकडे तिकीट मागणाºया चार उमेदवारांच्या नावाने जातीनिहाय आंतरिक सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला. विशेषत: ९६२५१६३४६५, ९६२५९३६१९६,९६२५८४४९७५ व ९३५४४२९७४५ या क्रमांकावरुन शहरातील अनेकांच्या व्हाट्सअ‍ॅपवर हा सर्व्हे व्हायरल करण्यात आला. या क्रमांकाचा तक्रारीतही उल्लेख करण्यात आला असून यावर संपर्क साधला असता हे सर्व क्रमांक बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या क्रमांकावरुन आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहेत.

निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून असा प्रकारे कोणताही सर्व्हे केला जात नाही. हा संदेश जाणीवपूर्वक व खोडसाळवृत्तीने प्रसारीत करण्याचा उद्देश दिसून येत आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.- डॉ. प्रसाद देशमुख, नगर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा वर्धा

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ