शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी जातीची क्रिमिलेअरची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:01 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाकडे अहवाल क्र. ४९ सादर केला. त्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्यात आले; पण यात राज्यातील ‘कुणबी’ जातीचा उल्लेख नाही.

ठळक मुद्देसंघटनांची मागणी : जिल्हाधिकाºयांसह राज्य मागास आयोगाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाकडे अहवाल क्र. ४९ सादर केला. त्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्यात आले; पण यात राज्यातील ‘कुणबी’ जातीचा उल्लेख नाही. यामुळे कुणबी समाजावर अन्याय झाला आहे. कुणबी समाजाला क्रिमिलेअरच्या अटीतून वगळण्यात यावे, अशी मागणी काँगे्रससह विविध संघटनांनी केली आहे. याबाबत मंगळवारी व बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदविण्यात आले.कुणबी समाज हा महाराष्ट्र राज्यात पूर्वीपासून शेतीशी निगडीत समाज आहे. यामुळे तो आर्थिक व समाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती व शेतमजूर हा कुणबी समाजाचा पूर्वापार व्यवसाय आहे. कोणत्याच संदर्भाने महाराष्ट्रातील कुणबी समाज संपन्न वा वैभवशाली जीवन जगत नाही, हे वास्तव आहे. इतर मागास प्रवर्गातील कुणबी जात समूहासह इतर सर्व जाती समूहाला क्रिमिलेअर अट शिथिल होण्याबाबत निर्णय व्हावा. ओबीसी समूहासाठी ठेवण्यात आलेली क्रिमिलेअर ही अट काढावी. सदर अट कुणबी जातीला असून नये, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने याबाबत आक्षेप नोंदविला आहे. कुणबी जातीला क्रिमीलेअर अटीतून वगळावे. तसे न झाल्यास काँग्रेसद्वारे जिल्हाभर तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असे असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, सुधीर पांगुळ, रामभाऊ सातव, माजी जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, कृउबास उपसभापती पांडुरंग देशमुख, जि.प. सदस्य संजय शिंदे, मनीष गंगमवार, सुनील तळवेकर, मनोज चौधरी यांच्यासह काँगे्रस तथा अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.२६ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदवाकुणबी जातीला क्रिमिलेअरची अट कायम ठेवली आहे. हा अन्याय दूर करून किमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिजाऊ ब्रिगेड, राजपत्रित अधिकारी महासंघ, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, भूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, लिपीकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, कुणबी समाज संघटना, गुरूदेव सेवा मंडळ, महात्मा फुले समता परिषद आदी संघटनांनी केली. याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री, भा.रा. गावित यांना निवेदन पाठविले आहे. शिवाय कुणबी समाजातील संघटना, नागरिकांनी २६ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.निवेदनातून इतर मागासवर्ग प्रवर्गातील कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा कुणबी, लेवा पाटील या जातीचाही समावेश करावा व या जाती समूहासह इतर सर्व जाती समूहाला क्रिमिलेअरची अट शिथील करावी. कुणबी समाजावरील अन्याय दूर करावा. या शिफारशींबाबत मागविण्यात आलेले आक्षेप आणि सूचना सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात याव्यात. आक्षेप घेण्याकरिता देण्यात आलेली मुदत किमान तीन महिने वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.