लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतमालाची नियमनमुक्ती करून मार्केट सेस रद्द करण्यात यावे या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सर्व शेतमाल पूर्णपणे नियमनमुक्त करावा, शेतकºयाला शेतीमाल कोठेही व कुणालाही विकण्याचे तसेच खरेदी करण्याचे स्वातंत्र असावे, मार्केट सेस/फी/मंडी टॅक्स रद्द करावा. मार्केट कमिटीच्या आवारात किंवा बाहेर होणाºया व्यापारावर मार्केट सेस किंवा कोणताही कर आकारला जाऊ नये, मोठ्या शहरांच्या ठिकाणी फळे, भाजीपाला व इतर शेतमाल विकणाºया शेतकऱ्यांना काही नागरीक महानगरपालिका कर्मचारी व पोलिसांकडून होणारा त्रास थांबविण्यासाठी प्रत्येक हाऊसिंग सोसायटी, पार्क वा खुल्या जागेत शेतकºयांना आपला माल विकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात द्यावी, राज्यातील बाजार समित्यांनी स्विकृत केलेल्या आदर्श उपविधेचे कलम २ (१) अ नुसार कापूस गाडी खाली करण्याची मजूरी शेतकºयाकडून घेणे तातडीने बंद करावी. नाफेडव्दारा तूर व चना या शेतमालाच्या खरेदीची तातडीने सुरूवात करावी, नाफेडने गेल्यावर्षी खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे ताबडतोब द्यावे, आदी मागण्या या आंदोलनाच्या निमित्ताने रेटण्यात आल्या.आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व शेतकरी संघटनेच्या माजी प्रदेशाध्यक्ष सरोज काशीकर, राज्य कार्यकारी सदस्य मधुसुदन हरणे, सतीश दाणी, उल्हास कोटंबकर यांनी केले. सदर आंदोलनात गजानन निकम, सचिन डाफे, शांताराम भालेवार, दत्ता राऊत, हेमराज इखार, अरविंद राऊत, सारंग दरणे, भारत चौधरी, चैतराज मेहुणे, अरविंद बोरकर, पांडुरंग भालशंकर, सुभाष बोकडे, प्रकाश जिकार आदी सहभागी झाले होते.
शेतमालाची नियमनमुक्तीसह मार्केट सेस रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:09 IST
शेतमालाची नियमनमुक्ती करून मार्केट सेस रद्द करण्यात यावे या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
शेतमालाची नियमनमुक्तीसह मार्केट सेस रद्द करा
ठळक मुद्देमागणी : जिल्हा कचेरीसमोर शेतकरी संघटनेचे धरणे