शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी रद्द करा

By admin | Updated: July 14, 2017 01:34 IST

केंद्र शासनाने एक देश, एक कर अर्थात जीएसटीचा उदोउदो केला. सामान्य नागरिक मात्र या प्रवाहात फरफटत आहे.

महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने एक देश, एक कर अर्थात जीएसटीचा उदोउदो केला. सामान्य नागरिक मात्र या प्रवाहात फरफटत आहे. नागरिकांच्या दैनंदिन उपयोगाच्या तथा जीवनावश्यक वस्तुंवरही जीएसटी लागल्यामुळे त्या महागल्या आहेत. यामुळे असंतोष पसरला आहे. यातील जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी वर्धा जिल्हा महिला काँगे्रस कमिटीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले. विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून वर्धा जिल्हा महिला काँग्रेसने संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्या सह्यांची मोहीम राबविली होती. त्यावेळी सुमारे दोन हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. आता महिलांच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे मासिक पाळी होय. त्यात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनवरही १२ टक्के जीएसटी लागला आहे. परिणामी, महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक ताण जाणवत आहे. महिला नेहमी कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात व स्वत:च्या गरजांना दुय्यम स्थान देतात. तेव्हा जीवनावश्यक वस्तू महागल्याने अतिसामान्य महिलांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोबतच सर्वसामान्य नागरिकांना जीएसटीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेत जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, कुंदा भोयर, रंजना पवार, नलिनी भोयर, वैदा शेख यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.