शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

संचमान्यतेचा काळा जीआर रद्द करा

By admin | Updated: September 6, 2015 02:04 IST

शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या संच मान्यतेबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे.

शिक्षण मंत्र्याचा काळा अध्यादेश रद्द करा : शिक्षक दिनी शिक्षकांचे साकडेवर्धा : शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या संच मान्यतेबाबत नवा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार कारवाई केल्यास बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातीलन जिल्ह्यातील विविध संघटनांच्यावतीने शनिवारी या अध्यादेशाचा विरोध नोंदविला. यात महात्मा फुले समाला परिषेच्यावतीने काळ्या फिती लावून अप्पर जिलहाधिकारी संजय भागवत यांना निवदेन सादर केले. तर विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा कृति समितीच्यावतीने अुनदानाकरिता जिल्हा परिषदेच्या परिसरात काळे झेंडे दाखवित ठिय्या आंदोलन केले. शिक्षणमंत्र्यांनी २८ आॅगस्टला महाराष्ट्रात शिक्षण संच मान्यतेचा नवा अध्यादेश जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुमारे दोन कोटी विद्यार्थी शाळा बंद झाल्यामुळे शिक्षणापासून दूर फेकले जाणार आहेत. राजयातील सुमारे एक लाख शिक्षक हे अतिरिक्त ठरून, यापुढे त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. गत वर्षीच्या संचमान्यतेच्या गोंधळामुळे, मराठवाड्यात शिक्षकांनी आत्महत्या केल्याचे उदाहरण ताजेच आहे. आता महाराष्ट्रातही शिक्षकांनी आत्महत्या कराव्या काय असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येचे कारण देवून शाळा बंद करून दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून बाहेर फेकणाऱ्या, आणि राज्यातील एक लाख शिक्षकांना अतिरिक्त ठरविणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढलेला नवीन संच मान्यता निकषाचा काळा अध्यादेश तत्काळ रद्द करावा, तसेच महाराष्ट्राच्या शिक्षणाचे वाटोळे करणाऱ्या शिक्षणमंत्री तावडे यांची शिक्षणमंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन वर्धा अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, निळकंठ पिसे, विजय मुळे, निळकंठ राऊत, मुख्याध्यापक प्रदीप महल्ले, देविदास गावंडे, विनोद राऊत, धनराज कोल्हे, योगेश्वर कलोडे, अनिल खडतकर, राजेंद्र माकोदे, सुधीर साळवे, जयंत भालेराव, एकनाथ इंगोले, अनिल तडस, हरिष पुनसे, श्याम जगताप, बुचे, केशव तितरे, गजानन चौधरी, अजाब तिमांडे, उमेश नंदनवार यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)