शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्ज भरण्याची त्रासदायक अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:54 IST

शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपये इतकी कर्ज माफी जाहीर केली आहे. या कर्ज माफीच्या योजनेला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : शेतकºयांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपये इतकी कर्ज माफी जाहीर केली आहे. या कर्ज माफीच्या योजनेला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ घ्यावयाचा असल्यास आॅनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. प्रत्येक आॅन लाईन सेवा केंद्रात शेतकºयांची एकच गर्दी होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आॅन लाईन अर्जाची अट रद्द करावी, मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर मागणीचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांच्या मार्फत सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल कडू यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविले आहे. निवेदनातून, सध्या प्रत्येक आॅन लाईन सेवा केंद्रात शेतकºयांंची प्रचंड गर्दी होत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणारा बळीराजा कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. आर्वी येथे कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छीनाºयांसाठी आॅन लाईन सेवा केंद्र देण्यात आले आहेत. परंतु, येथील लांबच लांब रांगा व वेळीच फेल होणारी लिंक यामुळे शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. आॅन लाईन सेवा केंद्रावर शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे.आॅन लाईन केंद्रावरील मोठी गर्दी पाहून अनेक शेतकरी आल्या पावली परत जात आहेत. जे थांबून अर्ज भरण्याची इच्छा ठेवतात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या सर्वाधिक त्रास वयोवृद्ध शेतकरी व महिला शेतकºयांना सहन करावा लागत आहे. ऐन कामांच्या दिवसांमध्ये शेतीच्या विविध कामांना फाटा देत दोन-दोन दिवस हेलपाटे मारूनही अर्ज भरल्या जात नाही. लहानसा अर्ज आॅन लाईन पद्धतीने भरण्यासाठी अनेकांना आठ-आठ दिवस हेलपाट्या मारव्या लागत आहेत. अर्ज भरून देणाºया केंद्रावर सध्या शेतकºयांची लूटच होत होत आहे. अव्वाच्या सव्वा मोबदला अर्ज भरून देणारे घेत आहेत. आॅन लाईन अर्ज भरणे ही अट शेतकºयांची अडचणी वाढविणारी असल्याने ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.उपविभागीय महसूल अधिकाºयांना निवेदन सादर करताना जि.प. माजी सभापती दादासाहेब गाडगे, सावकारी ग्रस्त समितीचे अध्यक्ष शेरसिंग जाधव, महादेव वानखेडे, गीता धोटे, युनुस पटेल, रमेश खैरवार, सुधाकर बायनोट, अरूण कुईटे, मधुकर दत्ययकार, अशोक कोल्हे, गंगाधर तायवाडे, प्रफुल्ल सोनवणे, कौसल्या दत्ययकार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.